Swargate Rape Case | पुण्यातील स्वारगेट (Swargate Rape Case) एसटी डेपोतील (ST depo) शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) याला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात, आरोपीच्या बँक खात्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या वकिलाने, दत्ता आणि पीडितेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता, मात्र तपासात आरोपीच्या खात्यात घटनेच्या वेळी फक्त २४९ रुपये असल्याचे आढळले.
आर्थिक व्यवहाराचा दावा फोल
आरोपीच्या वकिलाने दावा केला होता की, आरोपी आणि पीडिता यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते आणि आरोपीने पीडितेला ७,५०० रुपये दिले होते. मात्र, पोलिसांनी तपास केला असता, घटनेच्या वेळी आरोपीच्या बँक खात्यात केवळ २४९ रुपये शिल्लक होते. त्यामुळे, आरोपीच्या वकिलाने केलेले दावे खोटे ठरले आहेत. पोलिस आता त्या ७,५०० रुपयांचा शोध घेत आहेत, ज्याचा उल्लेख वकिलाने केला होता.
आरोपीच्या पत्नीने, बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे म्हटले आहे. तिने प्रश्न उपस्थित केला की, जर बलात्कार झाला असता तर तरुणीचे कपडे फाटले असते किंवा तिच्या अंगावर ओरखडे असते. तसेच, बसमध्ये चढताना तरुणी आधी आत गेली आणि त्यानंतर आरोपी गेला, त्यामुळे दोन मिनिटांत बलात्कार कसा होऊ शकतो?
आरोपीच्या वकिलाने दावा केला होता की आरोपी आणि पिडीत एकमेकांना महिन्याभरापासून ओळखत होते. या दाव्याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी दोघांच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर (CDR) तपशील तपासले, पण त्यामध्ये ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
आर्थिक स्थितीची चौकशी
पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्याची आणि ऑनलाईन पेमेंटची (Online Payment) चौकशी केली. त्याच्या मोबाईलमधून कोणाला पैसे हस्तांतरित केले गेले, याचा तपास केला. परंतु, पीडित तरुणी आरोपीच्या संपर्कात नव्हती आणि आरोपीने तिला पैसे दिल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे, आरोपीने सांगितलेली रक्कम आणि आर्थिक व्यवहाराची माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Title : Swargate Rape Case Accused had only 249 Rupees in his Account






