‘संबंध संमतीनेच…’; स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाचा जामीन अर्जात धक्कादायक दावा!

On: April 3, 2025 10:45 AM
pune swargate news
---Advertisement---

Swargate Rape Case | पुणे (Pune) शहरातील स्वारगेट (Swargate) एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जात, आरोपी आणि पीडिता यांच्यात झालेले शारीरिक संबंध हे परस्पर संमतीनेच (Mutual Consent) होते आणि त्यामुळे हा बलात्काराचा गुन्हा ठरत नाही, असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

‘संबंध संमतीने, हा गुन्हा नाही’

स्वारगेट एसटी स्थानकात २५ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आता आरोपीचे वकील वाजिद खान-बिडकर (Wajid Khan-Bidkar) यांनी त्याच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या जामीन अर्जात आरोपीच्या वतीने म्हटले आहे की, पीडिता आणि आरोपी यांच्यात जे काही शारीरिक संबंध झाले, ते दोघांच्याही संमतीने झाले होते.

“संमतीनेच आणि संमतीने झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही,” असे अर्जात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच, शारीरिक संबंधांची वेळ वैद्यकीय दृष्ट्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, पीडितेने दिलेल्या जबाबानुसार जबरदस्तीने संभोग करणे अशक्य वाटते, असा युक्तिवादही करण्यात आला आहे. यामुळे हे सिद्ध होते की, जे काही झाले ते संमतीनेच झाले, असे अर्जात म्हटले आहे.

पीडितेच्या जबाबावर आणि परिस्थितीवर प्रश्नचिन्ह?

आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्जात पीडितेच्या जबाबातील काही मुद्द्यांवर आणि तत्कालीन परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अर्जानुसार, पीडितेने तिच्या फिर्यादीत म्हटले होते की, तिच्या बाजूला एक वयस्कर व्यक्ती बसली होती आणि ती देखील त्याच बसने प्रवास करणार होती. मग ती वयस्कर व्यक्ती पीडितेसोबत किंवा आरोपीसोबत का गेली नाही? यावरून संशय निर्माण होत असल्याचे अर्जात म्हटले आहे.

याशिवाय, स्वारगेट स्थानकावर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे असतानाही, पोलिसांनी अद्याप संबंधित फुटेज न्यायालयात सादर केलेले नाही. यावरून आरोपीने कोणतीही गैरकायदेशीर कृती केली नाही, हे सिद्ध होते, असा दावाही करण्यात आला आहे. तसेच, पीडिता नियमितपणे फलटणला (Phaltan) जाणारी असून, तिला सकाळी ५ वाजल्यापासून दर तासाला फलटणसाठी बस असल्याची माहिती होती. असे असतानाही, ती अनोळखी व्यक्तीसोबत (आरोपीसोबत) बसमध्ये थांबली किंवा गेली, ही बाब अशक्य वाटते, असे मुद्दे जामीन अर्जात मांडण्यात आले आहेत. आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

Title | Swargate Rape Case Accused Bail Plea Claims Consent

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now