अटकेपूर्वी आरोपी गाडेने आत्महत्येचा केला होता प्रयत्न, ग्रामस्थांनी केला नवा खुलासा!

On: February 28, 2025 12:28 PM
datta gade
---Advertisement---

Swargate Crime Case | स्वारगेट (Swargate) एसटी स्टँडमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला अखेर अटक करण्यात आली आहे. आरोपीला पकडण्याआधी तो आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. मात्र, जागरूक ग्रामस्थांनी त्याला बोलण्यात गुंतवत वेळीच रोखले. त्याच्याकडून आत्महत्येसाठी वापरण्यात येणारे रोगर औषधदेखील जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

गावकऱ्यांनी आरोपीला पकडले-

दत्ता गाडे (Swargate Crime Case) अटकेपूर्वी गावात परतला असता, तो आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. काही स्थानिक नागरिकांनी त्याला संभाषणात गुंतवून ठेवत त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. यावेळी त्याच्या हातात रोगर औषधाची बाटली आढळली, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांची सततची उपस्थिती-

गावात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. आरोपीच्या (Swargate Crime Case) कृतीमुळे संपूर्ण गावाची बदनामी होत असल्याने ग्रामस्थ संतप्त होते. तसेच, पोलिसांनी गावात मोठ्या प्रमाणात छावणी उभारल्याने ग्रामस्थ अस्वस्थ होते. आरोपीच्या अटकेनंतर ग्रामपंचायत सदस्य तेजस भगत (Tejas Bhagat) आणि दत्ता गाडेचे काही मित्र यांच्याकडून या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यात आली.

स्थानिक नागरिकांची मदत-

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांनी देखील मदत केली. आरोपी गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर, नागरिकांनी पोलिसांना तपासात सहकार्य केले.

72 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले. या घटनेमुळे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

News Title : Swargate Crime Case Accused to do suicide

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now