Baramati Loksabha l लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला पार पडलं आहे. मात्र या टप्प्यात बारामती मतदार संघ चांगलाच चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात अनेक आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. मात्र तिसऱ्या टप्य्यात बारामती मतदान संघातील वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँकेची शाखा पहाटेपर्यंत सुरु असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता.
पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापकाचं निलंबन :
आमदार रोहित पवारांनी बॅंकांतून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा धक्कादायक आरोप केला अजित पवार गटावर केला होता. मात्र याप्रकरणाची निवडणूक आयोगाकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या एक दिवस आधी रात्री पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हा शाखेचे (PDCC Bank) मॅनेजर तलवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तेलवडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
आता या सर्व प्रकारावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच यामागे नेमका कोणत्या पक्षाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र निवडणूक आयो या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत याची चौकशी करणार आहेत.
Baramati Loksabha l नेमकं काय आहे प्रकरण? :
बारामतीच्या मतदानाच्या आदल्या मध्यरात्रीपर्यंत PDCC बँक चालू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आला होता. त्या तक्रारीला निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतले होते. निवडणूक आयोगाने याप्रकरणाची सखोल चौकशी केली आणि चौकशीनंतर व्यवस्थापकाचे निलंबन केले आहे.
निवडणूक आयोगाला बँकेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रँचमध्ये, डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये आत बाहेर आत बाहेर करत होते असे दिसून आले. प्रकारावरून निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या सर्व प्रकारामुळे आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवारांची आक्रमकता बारामतीकरांनी मतदानाच्या दिवशी अनुभवली आहे.
News Title – Suspension of manager of Velha branch of PDCC Bank
महत्त्वाच्या बातम्या
अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात
माझे मोदी सरकारबद्दल मतभेद राहणार! पण तरीदेखील महायुतीला मतदान करा; राज ठाकरे
शनीच्या कृपेने 24 तासांत हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; धो-धो पाऊस बरसणार
ब्रिजभूषण सिंह यांना झटका; लैंगिक शोषणप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय






