‘त्या’ भाकिताने राजकारणात खळबळ; “ललित पाटीलचा एन्काउंटर होणार”

On: October 27, 2023 4:07 PM
---Advertisement---

मुंबई | ललित पाटील (Lalil Patil) ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. त्याचवेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. अशात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

ललित पाटील (Lalit Patil) याच्या जीवाला धोका असून त्याचे एन्काऊंटर केला जाऊ शकतो किंवा त्याचा आकस्मिक मृत्यू (Death) होऊन तपास थांबवला जाऊ शकतो, असं खळबळजनक वक्तव्य सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं आहे.

ससून रुग्णालयाचे आधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्कोटिक्स चाचणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संजीव ठाकूर खोटं बोलत आहेत. संजीव ठाकूर यांच्याबाबत सरकार काहीच भूमिका घेत नाही. हर्नियाच्या ऑपरेशनला 5 महिने कसे लागतात?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

संजीव ठाकूर यांच्यावर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे का? त्यांना ललित पाटील याच्याकडून आर्थिक लाभ होता का? असे प्रश्न उपस्थित करुन संजीव ठाकूर यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now