गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

On: February 28, 2024 10:43 PM
Gautami Patil Controversy
---Advertisement---

Sushma Andhare | आगामी लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सध्या जागा वाटपावरून बैठकी होताना दिसत आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये कामाची पाहणी करत असून त्याठिकाणी होणाऱ्या नागरिकांच्या समस्येवर आवाज उठवत सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीआधी राजकीय रणधुमाळी पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मतदारसंघात जावून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीकेची तोफ डागली आहे.

यंदाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत एकाच पक्षात असणारे उमेदवार हे आता परस्पर विरोधामध्ये लढणार आहे. म्हणून यंदाच्या अनेक मतदारसंघामध्ये नेमकं आगामी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे सांगणं जरा अवघड असणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शहापूरमध्ये जात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्ला

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भिवंडीत येत शहापूरमध्ये जोरदार हल्ला केला आहे. सुषमा अंधारेंकडून (Sushma Andhare) अनेकदा मोठ मोठ्या नेत्यांविरोधात टीका केलेल्या पाहायला मिळतात. आता त्यांनी थेट केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या मतदारसंघातील काम आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सडकून टीका केली आहे. तर काही वेळा कपिल पाटील यांनी गौतमी पाटीलला आपल्या मतदारसंघामध्ये नाच करण्यासाठी बोलावल्यानं सुषमा अंधारे यांनी गौतमी पाटीलला भाजपमधून निवडणुकीसाठी तिकिट द्या, अशी टीका केली आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे बोलत असताना त्यांनी पिण्याच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. भिवंडीमध्ये एकूण मोठी 14 आणि छोटी 4 धरणे आहेत. तरीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कपिल पाटील यांना गर्दी जमवता येत नाही, कोणी त्यांच्याकडे जात नाही, म्हणून हे आता त्यांच्याही लक्षात आलं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

कपिल पाटील यांना गर्दी जमावता येत नाही म्हणून हे आता त्यांच्याही लक्षात आलं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाले आहेत. यामुळे आता कपिल पाटील यांनी एक शक्कल लढवली आहे. गौतमी पाटीलला बोलावून ते आता गर्दी जमा करत आहेत. त्यामुळे आता गौतमी पाटीलला भाजपने निवडणुकीचं तिकिट द्यावं, अशी मिश्कील टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

गौतमी पाटीलने तिकडं गाणं म्हणावं की पाटलांचा बैलगाडा आणि हिकडं शिंदे आणि फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलाय राडा, संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे, असं सुषमा अंधारे यांनी टीकेची तोफ डागली आहे.

News Title –  Sushma Andhare Talk About Gautami Patil Will Enter In BJP

महत्त्वाच्या बातम्या

संकष्टी चतुर्थीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज; थेट म्हणाले..

‘अरे ही तर पॉर्न किंगची बायको..’, प्रसिद्ध अभिनेत्री झाली ट्रोल

मोठी बातमी! मनोज जरांगेंनी उचललं मोठं पाऊल

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने दिली गुड न्यूज

Join WhatsApp Group

Join Now