‘अहो गृहमंत्री साहेब, महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का?’; सुषमा अंधारे भडकल्या

On: October 22, 2023 4:06 PM
---Advertisement---

मुंबई | बीडमध्ये एका जमिनीचा वादातून महिलेची विवस्त्र करत धिंड काढल्याचा आरोप आला आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. वाळूंज गावात ही घटना घडली असून या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला वडिलांपासून 50 ते 60 वर्षांपासून वाळुंज शिवारातील जमीन त्या कसत आहेत. मात्र रघु, राहुल आणि सुरेश धस या पीडित पारधी कुटुंबाला जमिनीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आहेत.

महिलेचा आरोप आहे की, शेतात काम करत असतांना रघु आणि राहुल यांनी येऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना प्राजक्ता धस यांनी प्रोत्साहन दिलं.

बीडमधील या प्रकारावरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे जेव्हा गुंडगिरी करतात, या वंचित, उपेक्षित, बहिष्कृत समाजातील माय माउल्यांच्या पदरांना हात घालण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का?, असा सवाल अंधारेंनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now