‘त्या 2 नेत्यांची नार्को टेस्ट करा’; सुषमा अंधारेंचा धक्कादायक आरोप

On: October 18, 2023 3:43 PM
---Advertisement---

मुंबई | ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalil Patil) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. यानंतर ललित पाटीलने मी ससून मधून पळालो नाहीतर मला पळवलं गेलं, असं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

याप्रकरणात फक्त ससून रूग्णालय प्रशासनाचा नाहीतर काही बड्या राजकीय शक्तींचा हात आहे, असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय. सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांबाबतही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

जो पोलीस म्हणाला की, ललित पाटील माझ्या हाताला झटका देऊन पळाला, तोच पोलीस ललित पाटील याच्यासोबत लेमन ट्री हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. त्यामुळे ललित पाटील याला ससूनमधून कोणी पळवून लावलं ,हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

दरम्यान, ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now