सुशीलकुमार शिंदे यांची मोठी घोषणा!

On: October 24, 2023 1:41 PM
---Advertisement---

सोलापूर | धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यांनी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

मी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे (Praniti Shinde Lok Sabha) याच काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशी मोठी घोषणा त्यांनी केलीये.

दरवर्षी आम्ही जयंती आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतं असतो. मात्र योगायोगाने मी आज सोलापुरात आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे, असं सुशीलकुमार शिंदे म्हणालेत.

बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला दिली, त्या घटनेचा इतका जयजयकार झाला की त्या घटनेनुसारच आज देश चालतो आहे. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आता कुठल्या पक्षाला राजकारणदेखील करता येत नाही हे आता सिद्ध झालं आहे, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now