सुशांत सिंह राजपूतची बहीण आता राजकारणाच्या रिंगणात; ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढवणार

On: October 14, 2025 7:21 PM
Divya Gautam
---Advertisement---

Divya Gautam Bihar Election | बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मामेबहीण दिव्या गौतम या यंदाच्या निवडणुकीतून रिंगणात उतरणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) म्हणजेच भाकप यांनी दिव्या गौतम यांना पाटण्याच्या दीघा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. (Divya Gautam Bihar Election)

दिव्या गौतम ((Divya Gautam) यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात विशेष चुरस निर्माण झाली आहे. त्या 15 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्या नावाची पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दिव्या यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत राजकीय आणि भावनिक दोन्ही स्तरांवर चर्चा रंगू लागली आहे.

भाजप विरुद्ध भाकपचा सामना; दीघा मतदारसंघात चुरस वाढली :

भाकप (माले) पक्षाने दिव्या गौतम ((Divya Gautam) यांना उमेदवारी दिल्यानंतर या मतदारसंघात थेट भाजप विरुद्ध डावे पक्ष अशी लढत रंगणार आहे. एनडीएच्या जागावाटपात दीघा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे, तर इंडिया आघाडीतून ही जागा भाकप (माले) कडे आहे. त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांमध्ये नसून दोन विचारसरणींच्या संघर्षात रूपांतरित होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ((Divya Gautam Bihar Election))

2020 साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे संजीव चौरसिया यांनी 97,044 मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांनी भाकपच्या शशी यादव यांचा पराभव केला होता, ज्यांना 50,971 मते मिळाली होती. त्यामुळे यंदा दिव्या गौतम या मतदारसंघात कितपत प्रभाव दाखवतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Divya Gautam Bihar Election | कोण आहे दिव्या गौतम? :

दिव्या गौतम ही सुशांत सिंह राजपूतची (Sushant SIngh Rajput) मामेबहीण असली, तरी ती केवळ “सेलिब्रिटी नात” म्हणून ओळखली जात नाही. पाटणा विद्यापीठातील पाटणा कॉलेजमधून तिने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. विद्यार्थी अवस्थेत असतानाच ती राजकारणात सक्रिय होती. 2012 साली AISA तर्फे तिने पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, जरी ती त्यावेळी पराभूत झाली होती. ((Divya Gautam)

दिव्या गौतमने पहिल्याच प्रयत्नात बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन (BPSC) परीक्षा पास केली होती आणि त्यात 64 वा क्रमांक मिळवला होता. तिला अन्न पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली होती, मात्र तिने सरकारी नोकरी न करण्याचा निर्णय घेत स्वतःच्या राजकीय वाटचालीवर भर दिला. सध्या ती पीएचडी करत असून नेट परीक्षा उत्तीर्ण आहे.

News Title: Sushant Singh Rajput’s sister Divya Gautam to contest Bihar Election 2025 from Digha on CPI(ML) ticket

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now