फायनलआधीचं सूर्याचा न्यूझीलंडला खणखणीत इशारा! अंतिम सामन्यात चित्र असं असणार

On: March 8, 2026 3:03 PM
IND vs NZ
---Advertisement---

Ind vs NZ | T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आत्मविश्वासात दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज रविवारी ८ मार्च रोजी अहमदाबादमधील Narendra Modi Stadium येथे अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या निर्णायक लढतीपूर्वी सूर्यकुमार यादवने संघाची तयारी आणि मानसिकता स्पष्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अंतिम सामन्यात दबाव असणार, पण संघ तयार :

सूर्यकुमार यादवने सांगितले की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दबाव असणे स्वाभाविक आहे. भारतात खेळताना आणि ट्रॉफीसाठी लढताना संघावर अपेक्षांचा ताण असतो. मात्र भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ या मोठ्या क्षणासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

त्याच्या मते, संघातील सर्व खेळाडू उत्साहात असून अंतिम सामन्यासाठी कठोर सराव करण्यात आला आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नेट्समध्ये जोरदार सराव करून रणनीतीवर काम केले आहे.

Ind vs NZ | उपांत्य फेरीतील विजयामुळे वाढला आत्मविश्वास :

भारताने उपांत्य फेरीत इंग्लडवर रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 250 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला. Sanju Samson याच्या 89 धावांच्या खेळीने संघाला मोठी मदत झाली.

इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर देत लक्ष्याचा पाठलाग केला. Jacob Bethell याच्या शतकामुळे सामना चुरशीचा झाला. मात्र इंग्लंडचा डाव 247 धावांवर थांबला आणि भारताने 7 धावांनी विजय मिळवला.

मात्र आता अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध कोणती रणनीती वापरतो आणि ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरतो का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

News Title: Suryakumar Yadav Warning Before T20 World Cup Final

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now