“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

On: April 18, 2024 8:48 AM
Eknath Shinde
---Advertisement---

Suresh Navale l सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते मंडळी दिवसरात्र प्रचारात दंग आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे सुरेश नवले यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

भाजप पक्ष ड्रामा करत आहे :

महायुतीच्या जागावाटपवार बोलताना सुरेश नवले म्हणले की, परभणीची जागा रासपाला म्हणजेच महादेव जानकरांना दिली. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. पण मला माहित आहे ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली जाणार आहे. रत्नागिरीची जागा भाजप पक्षाला सोडली आहे. भाजप पक्ष ड्रामा करत आहे. तसेच नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याच काम करत आहे. या राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणं आणि शिवसेना संपवण्याचा कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. तसेच भाजप शिवसेना पक्ष संपवत आहे, असे आरोप सुरेश नवले यांनी केले आहेत.

भाजप पक्षाने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवले असून त्यांचा अभिमन्यू झाला आहे असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांनी भाजप पक्षावर केला आहे. तसेच भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात असल्याचं नवले यांनी बोललं आहे. सुरेश नवले यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे राजकारणात एक प्रकारे वादाची ठिणगीच पडल्याचं दिसत आहे.

Suresh Navale l शिंदे गटाचे सुरेश नवले कडाडले :

यासंदर्भात सुरेश नवले म्हणाले की, भाजपाने कृपाल तुमाने , भावना गवळी, हेमंत पाटील यांचा बळी दिला आहे. तसेच भाजपाच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत.. हे महाराष्ट्रातल्या एकाही शिवसेनेसाठी शोभादायक नाही. शिवसैनिकाला न्याय मिळत नव्हता म्हणून हा उठाव झाला होता. मात्र सगळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत बाहेर पडले आणि सरकार अस्तित्वात आलं आहे.

ज्या कारणासाठी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सोडलं, ठाकरेंचं नेतृत्व झुगारलं आहे . मात्र आता त्याच शिवसैनिकांचा राग आहे. तसेच सामान्य शिवसैनिक तर सोडाच विद्यमान खासदारांना आपली खासदारकी देखील मिळवता आली नाही हे शिवसैनिकांचं दुर्दैव आहे. तसेच मित्र पक्षाचे उमेदवार सांभाळण्यासाठी पोसण्यासाठी शिवसेनेवर जबाबदारी असल्याचं चित्र सध्या दिसतं आहे, अशा शब्दांत सुरेश नवले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

News Title: Suresh Navale serious allegation on bjp

महत्त्वाच्या बातम्या-

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसेची फिल्डिंग; बैठकीत काय काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now