Supriya Sule | सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांचे निधन खासदार सुप्रिया सुळे यांच्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार (Bharti Prataprao Pawar) यांचे निधन झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट लिहून ही माहिती दिली.
सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल-
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भावूक पोस्ट “माझ्या काकी सौ. भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर खूप प्रेम केले. त्यांची प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.






