Supriya Sule vs Sunetra Pawar | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याने शरद पवार गट एकटा पडला आहे. बारामती लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule vs Sunetra Pawar) लढणार असल्याचं निश्चत असल्याचं बोललं जात आहे. एकाच कुटुंबातील आणि एकाच पक्षात उभी फूट पडल्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule vs Sunetra Pawar) आमने सामने लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. (Supriya Sule vs Sunetra Pawar)
काय म्हणाले सुनील तटकरे?
बारामती लोकसभा मतदारसंघाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीवर भाष्य करणं जरा अवघड आहे. राजकारणाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते आता घडलेलं पाहायला मिळालं आहे. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक आणि बारामती लोकसभा निवडणुकीवर अंदाज बांधता येत नाही. यावर आता सुनील तटकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. (Supriya Sule vs Sunetra Pawar)
अजित पवार यांच्या पत्नीला उमेदवारी?
बारामती मतदारसंघाची जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली तर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचं तटकरे म्हणाले आहेत. निवडणुकीच्या जागावाटपावर अद्यापही अंतिम निर्णय घेतला गेला नाही. जर निर्णय राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी लागला तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे, असं सुनील तटकरे म्हणाले.
बारामती मतदारसंघामध्ये मध्यंतरी अजित पवार हे दौंडचे आमदार राहुल कौल यांची पत्नी कांचन कुल यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये मागील लोकसभा निवडणुकीत लढत झाली असून सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. सध्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार नणंद भाऊजय आमनेसामने लढणार आहेत.
काही माध्यमांनी बारामतीत जाऊन मतदारांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी युवा वर्ग हा अजित पवार यांच्या बाजूने असल्याचं जाणवलं. तसेच अजित पवार यांनी येत्या काळामध्ये मुख्यमंत्री पद भुषवावं असं देखील बारामतीकरांचं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे बारामतीतील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा सर्व कल हा सुप्रिया सुळे यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांआधी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा रथ बारामती परिसरामध्ये फिरत असलेला पाहायला मिळाला आहे. तर त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचा देखील रथ प्रचारासाठी बारामतीतून फिरवला.
News Title – Supriya Sule vs Sunetra Pawar Election On Sunil Tatkare statement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर, आता…
सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
मनोज जरांगेंना आता थेट ‘या’ पक्षातून ऑफर!
पत्नीला कधीच सांगू नका या गोष्टी, नाहीतर…; चाणक्यानं दिलाय मोठा इशारा
सुरेश धस मराठा आरक्षणावर काय बोलले?, का होतेय या भाषणाची एवढी चर्चा? पाहा व्हिडीओ






