पुण्यात बहिण-भाऊ आमनेसामने; सुप्रियाताईंचं दादांना आव्हान?

On: October 17, 2023 3:14 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे एक महत्त्वाचा कारोभार सोपवण्यात आला. पुण्याचे पालमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बदलीनंतर अजितदादांकडे पालकमंत्रीपद (Guardian Minister) देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गट वेगळा झाला. आधी अजित दादांचं पुण्यात अधिक लक्ष असायचं. सुप्रिया सुळे (Supriya Sule) बारामतीच्या खासदार असल्यानं आणि दादा पुण्याचेच पालकमंत्री राहत असल्यानं दादांकडेच पुण्याची जबाबदारी होती. दरम्यान आता दादांकडे पालकमंत्रीपद देण्यात आल्याने सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे अजित दादांनाच आव्हान दिलंय.

पुण्याचे कारभारी बदललेत त्यामुळं मलाही पुण्यात काम करावं लागेल, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ऐकवणं केलं. यामुळे पुण्यात बहिण-भाऊ आमनेसामने येणार असल्याचं दिसतंय.

दादा पालकमंत्री होताच, सुप्रिया ताईंनीही आपल्यालाही आता पुण्यात काम करावं लागेल असं म्हटलंय. याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील दादांना डिवचलं. सत्ताधाऱ्यांकडून स्वत:च्याच आमदारांचं सक्षमीकरण सुरु आहे. त्यामुळे सक्रीय व्हावंच लागेल असं रोहित पवारही म्हणालेत.

थोडक्यता बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now