लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

On: December 7, 2022 2:22 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये राजकीय नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना त्याचे पडसाद देशाच्या संसदेतही (Parliament Winter Session) उमटलेले पाहायला मिळाले.

लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमाप्रश्नावरून सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात भूमिका मांडताना त्यांनी अमित शहा यांनाही या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीये.

गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आलं. दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. हे चालणार नाही. हा देश एक आहे. मी अमित शहा यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

दरम्यान, राज्यसभेत आज ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील सीमाप्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडलाय. तो मान्य होतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now