“30 वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गीतेंनी केला नाही”, तटकरेंचं गीतेंना प्रत्युत्तर

On: April 29, 2024 7:00 PM
Sunil Tatkare
---Advertisement---

रायगड | रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आघाडीचे अनंत गीते यांच्यावर निशाणा साधला आहे. अनंत गिते यांनी 30 वर्षे खासदार असताना कुणबी समाजासाठी काय केले?, असा सवाल सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अनंत गितेंना विचारला आहे.

सुनील तटकरेंचं गीतेंना प्रत्युत्तर

गुहागर विधानसभा मतदारसंघातील हेदवी येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा खारवी समाज भवनात पार पडली. त्यावेळी सुनील तटकरे बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच सर्वधर्मियांना सोबत घेऊन भविष्यात काम करणार आहे, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं.

राज्यात 45 + जागा मिळतील- सुनील तटकरे

एखाद्या समाजाला निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली नव्हती, ती घोषणा अजित पवार यांनी केली. गावावस्तीत जाऊन ही ऐतिहासिक निवडणूक लोकांना सांगण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत जनता साथ देईल आणि राज्यात 45 + जागा मिळतील, असा दावा रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलाय.

बकासुर, टकमक टोक, बूच अशी वक्तव्ये करत संसदेत अनंत गीते यांनी काम केलं. 30 वर्षांत एखाद्या गावातील साधा रस्ताही अनंत गीते यांनी केला नाही. मी ऊर्जा मंत्री असताना राज्यातील भारनियमन रद्द करून जनतेला दिलासा दिला असंही तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले.

तुमची – माझी श्रद्धा संविधानावर आहे आणि कायम राहणार आहे. मात्र नरेंद्र मोदी संविधान बदलणार असं जाणीवपूर्वक सांगत सामाजिक पाप विरोधक करत आहेत. देशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. या देशाची अखंडता, एकात्मता बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे. देशात आणीबाणीच्यावेळी उद्रेक झाला आणि त्यातून चळवळ उभी राहून इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा पराभव झाला. ही वस्तुस्थिती सांगताना ही लोकशाही प्रणाली जनतेने त्यावेळी दाखवून दिली असल्याचंही तटकरेंनी सांगितलं.

दरम्यान, वेगवेगळ्या आघाड्यांची सरकारे त्याकाळात अनुभवायला मिळाली. आम्ही भाजपसोबत गेलो मात्र आम्ही आमचा सिध्दांत सोडून दिला नाही. सलग तीन वेळा सरकारे बनली एवढी अस्थिरता देशात निर्माण झाली होती. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आणि राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आणि जनतेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन आज दहा वर्षांत झालेला विकास अनुभवत आहोत, असं तटकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बँक घोटाळा कसा झाला उघड?, मोठी माहिती हाती

राजकारणाचा चिखल!, काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार, भाजपसोबत जाऊन फुलवणार कमळ

“मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात…”, मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींचा पलटवार

अभिषेकसोबतच्या भांडणावर अखेर ऐश्वर्याचा मोठा खुलासा, म्हणाली…

नागरिकांनो सावधान; घराबाहेर पडणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने जारी केल्या विशेष सूचना

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now