राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंचं सर्वात मोठं विधान!

On: February 11, 2026 6:29 PM
Sunil Tatkare
---Advertisement---

Sunil Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच खासदार सुनील तटकरे यांनी यावर थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असतानाच तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत, “विलीनीकरणाचा मुद्दाच कुठे येतो? आम्ही कायम NDA सोबतच आहोत,” असे ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत.

अजित पवार (ajit pawar) यांच्या विमान अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. मात्र अजित पवार गटातील नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा दिलेला नाही. अशा परिस्थितीत सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडत विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, तटकरेंची ठाम भूमिका :

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) तसेच राज्यसभेच्या सभापतींची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार सुनील तटकरे हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केलं.

“आमच्या पक्षाच्या भूमिकेचा प्रश्नच येत नाही. कारण मी वारंवार विचारतो की विलीनीकरण कोणत्या पक्षात करायचं? आम्ही NDA मध्ये आहोत आणि दादांच्या नेतृत्त्वात NDA सोबत जाण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे. हीच भूमिका आजही आहे आणि भविष्यातही राहील,” असं तटकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना जोरदार झटका बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Sunil Tatkare | भविष्यातही NDAतच राहणार, तटकरेंचा पुनरुच्चार :

सुनील तटकरे (Sunil Tatkare) पुढे म्हणाले की, “एनडीएमध्ये जाण्याबाबत आमची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली, ती आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणूनच. राष्ट्रवादीच्या सर्व बैठकांमध्ये अजितदादा कायम एनडीएमध्ये राहण्याचा विचार मांडायचे.” त्यांच्या मते, 2019 सालीही दोन पक्ष एकत्र आल्यास राज्याचा अधिक चांगला विकास होईल, असा अजित पवारांचा विचार होता.

तटकरे यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडींना वेगळं वळण मिळालं आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागतो की नाही, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी अजित पवार गटाची भूमिका NDA सोबत ठामपणे उभी असल्याचं तटकरे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे.

News Title: Sunil Tatkare Rules Out NCP Merger, Says Party Will Remain with NDA

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now