मोठी बातमी! बारामतीच्या राजकारणात अजून एक पवार, अजितदादांचं टेंशन वाढलं

On: April 16, 2024 3:52 PM
Sunanda Pawar filed the application for Baramati Lok Sabha
---Advertisement---

Baramati Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती तसंच महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच जागा निश्चित झाल्या आहेत. काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक यंदा अधिक चर्चेत आली आहे. कारण, येथे पवार कुटुंबच एकमेकांविरोधात उभं ठाकलं आहे.

या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आव्हान देणार आहेत. या ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना होणार आहे.

सुनंदा राजेंद्र पवार मैदानात

मात्र, आता बारामतीच्या राजकारणातून सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे. येथे रोहित पवारांच्या आई सुनंदा राजेंद्र पवार मैदानात उतरल्या आहेत. सुनंदा पवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून बारामती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे.

डमी अर्ज म्हणून अजित पवार यांनीही यापूर्वी अर्ज घेतला होता. आता शरद पवार गटाकडून (Baramati Lok Sabha) सुनंदा पवार यांनीही अर्ज घेतल्याने राजकारणात याच्याच चर्चा रंगल्या आहेत. याचा नेमका अर्थ काय?, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बारामतीत रोहित पवारांच्या आईचा अर्ज दाखल

शरद पवारांचे विश्वासू लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनंदा पवार यांनी बारामती अॅग्रोच्या माध्यमातून बारामतीत कार्य केलं आहे. जर सुप्रिया सुळे यांचा अर्ज बाद झाला तर पर्यायी सुनंदा पवार येथे उभं राहू शकतात, अशी चर्चा राजकारणात होऊ लागली आहे.

म्हणूनच डमी अर्ज म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरण्यात आला आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या आई या बारामतीच्या (Baramati Lok Sabha) मैदानात उतरल्या असं म्हणायला हरकत नाही. सुनंदा पवार आता या अर्जामुळे चर्चेत आल्या आहेत. बारामतीमध्ये सध्या दोन्ही पवारांकडून खबरदारी घेतली जात आहे.

News Title-Sunanda Pawar filed the application for Baramati Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या –

सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस-शिवसेनेत संघर्ष; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने मोठा ट्विस्ट

श्रीकांत शिंदेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

साताऱ्यातून उमेदवारी जाहीर होताच उदयनराजे म्हणाले…

‘माझं राहुल गांधींसोबत लग्न…’; ‘या’ महिला नेत्याचा मोठा खुलासा

नाशिककरांनो काळजी घ्या!; जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढला

Join WhatsApp Group

Join Now