उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पीत असाल तर सावधान, तज्ज्ञांचा मोठा इशारा

On: April 20, 2024 3:04 PM
---Advertisement---

Summer health care | राज्यात तापमान प्रचंड वाढत आहे. उष्णतेच्या झळा वाहत आहेत. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अजूनह वाढली आहे. उन्हाचे चटके अधिकच जाणवू लागल्याने शक्यतो दुपरून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.

खूप गडद आणि डार्क रंगाचे कपडे न घालता साधे वस्त्र वापरणे, उन्हात बाहेर पडताना सनग्लासेस, छत्री आणि डोक्यावर रुमाल घेऊनच बाहेर पडावं. यासोबतच शरीराला थंड ठेवण्यासाठी कलिंगड, संत्री-मोसंबी याचे रस किंवा ऊसाचा रस पिणे, डीहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे ही काळजी घ्यावी.

बऱ्याचदा असं होतं की, आपण कडक उन्हातून घरी आलो किंवा कुठे बाहेर गेलो की लगेच गळा कोरडा पडतो आणि तहान लागते. अशात आपण लगेच थंड पाणी पितो. पण असं करणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं.

उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये

उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराचे तापमान बिघडते. बाहेरून आल्यावर शरीराचे तापमान वाढते आणि त्यात तुम्ही अचानक थंड पाणी पिता, तेव्हा तुम्हाला थंडी आणि उष्णतेची समस्या होते. त्यामुळे सर्दी, ताप येण्याची शक्यता असते.

अचानक थंड पाणी पिले तर तुमच्या पचनावरही परिणाम होतो. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला अपचनाची तक्रार निर्माण होऊ शकते. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.

यामुळे हृदयासाठीदेखील धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा तुम्ही (Summer health care) थंड पाणी पितात, तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या उडतात आणि रक्तप्रवाह मंदावतो. अशा स्थितीत हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचते.

बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण तुमचा ब्रेन फ्रीज होतो. जास्त थंड पाणी प्यायल्याने मेंदूच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो, ज्यामुळे मेंदू नीट काम करू शकत नाही.

News Title : Summer health care

महत्त्वाच्या बातम्या – 

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

Join WhatsApp Group

Join Now