उष्णतेवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ आवर्जून खा; मिळतील फायदे

On: April 11, 2024 10:52 AM
Summer Foods
---Advertisement---

Summer Foods | उन्हाचा कडाका वाढला आहे. आता एप्रिल महिन्यात अजूनच कडक ऊन असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात वाढ झाल्याने आता रात्रीही दमटपणा जाणवत आहे. अशा तळपत्या उन्हात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

शरीराला थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात काही पदार्थ आवर्जून खायला हवेत. या काळात बहुतांश लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. जेव्हा शरीरात पाण्याची तीव्र कमतरता असते आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या प्रमाणात खूप फरक असतो तेव्हा ही समस्या उद्भवते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

यासाठी आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात जेवढी आवश्यकता आहे तेवढं पाणी प्यायला हवं. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी जास्त पाणी पिणे योग्य नाही. कारण त्यामुळे किडनीवर दबाव येऊ शकतो.

‘अशी’ करा उष्णतेवर मात

काकडी : काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करण्यासाठी तुमच्या शरीराला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यात असते. पाण्याव्यतिरिक्त, काकडीत इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन सी सारख्या जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात. त्यामुळे रोज काकडी खायला हवी.

गोंड कटिरा : हा पदार्थ फायबर आणि कॅल्शियम आणि लोहासारख्या खनिजांनी समृद्ध असलेला नैसर्गिक डिंक आहे. पेये आणि पदार्थांमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी ते पाण्यात भिजवून जेलीमध्ये बदलले जाऊ शकते. उन्हाळ्यात याचा आहारात समावेश करायला हवा.

कलिंगड: कलिंगडमध्ये (Summer Foods ) अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात शरीराची लाहीलाही होत असल्याने पुरेसे अन्न खाल्ले जात नाही.अशात कलिंगड खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे मिळण्याचे काम होते. त्यामुळे शरीराचे पोषण करण्याचे काम कलिंगड करते.

मठ्ठा किंवा ताक : उन्हाळ्यात दुपारी ताक पिण्यास अधिक प्राधान्य दिलं जातं. कारण,त्यात व्हिटॅमिन बी 12 सारखी जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात. ताकचे सेवन केल्यास शरीर थंड राहते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

मिंट डिटॉक्स वॉटर: मिंट डिटॉक्स वॉटर पुदिन्याच्या ताज्या पानांसह पाण्यात टाकून तयार केले जाते.याचे पाणी दिवसभर पिल्यास खूप फायदा होतो. यामुळे ताजेतवाने वाटते आणि शरीरही थंड राहण्यास मदत होते.

नारळ पाणी : उन्हाळ्यात रस्त्याच्या प्रत्येक ठिकाणी नारळ पाणी (Summer Foods ) दिसून येते. नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब कमी होतो. यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात. यामुळे उन्हाळ्यात खूप फायदा होतो. म्हणून नारळ पाणी रोज पिले पाहिजे.

News Title- Summer Foods

महत्त्वाच्या बातम्या –

सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय!

पुण्याच्या जागेवर वसंत मोरेंचा नवा डाव, ‘या’ पक्षाचं तिकीट फायनल?

भाजप उमेदवार कंगनाची प्रचार रॅली; म्हणाली, “मंडीतील राष्ट्रवादी आवाज…”

…म्हणून ऋषभ पंत ठरला नंबर 1; सामना सुरु होताच कित्येक दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

रिषभ हे वागणं बरं नव्हं…! राजस्थानविरूद्ध स्वस्तात बाद होताच पारा चढला, Video

Join WhatsApp Group

Join Now