Government Scheme l केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. अशातच केंद्र सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी खर्च करता येते. तसेच या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर सरकारकडून व्याज देखील दिले जाते.
तुम्ही किती गुंतवणूक करू शकता? :
सध्या या योजनेवर सरकार 7.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते आणि योजना 21 वर्षात ती परिपक्व होते. याचा अर्थ असा की तुम्ही जितक्या कमी वयात तुमच्या मुलींसाठी गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितक्या लवकर योजना परिपक्व होईल आणि तुम्ही तुमच्या मुलीसाठी योजनेची रक्कम वापरू शकता.
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर 21 वर्षांनंतर तुमच्याकडे विशिष्ट रक्कम जमा होईल. जर तुम्ही एका वर्षात किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता.
Government Scheme l किती गुंतवणुकीवर किती परतावा मिळतो :
1,000 रुपये मासिक गुंतवणूक :
तुम्ही या योजनेत महिन्याला 1,000 रुपये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात 12,000 गुंतवाल. याचा अर्थ 15 वर्षात तुम्ही एकूण 1,80,000 रुपये गुंतवले असतील. तर यावर तुम्हाला अंदाजे 3,29,212 रुपये व्याज मिळेल. ही योजना पूर्ण झाल्यावर तुम्हाला एकूण 5,09,212 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला एकूण 3,29,212 रुपयांचा परतावा मिळेल.
2,000 रुपये मासिक गुंतवणूक :
तुम्ही दरमहा 2,000 रुपये गुंतवले तर एका वर्षात 24,000 रुपये आणि 15 वर्षात 3,60,000 रुपये गुंतवाल. यावर तुम्हाला 6,58,425 रुपये व्याज मिळेल. तसेच ही योजना 21 वर्षांनी परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला एकूण 10,18,425 रुपये मिळतील.
3,000 च्या गुंतवणुकीवर किती रक्कम मिळेल :
तुम्ही तुमच्या मुलीसाठी दरमहा 3,000 रुपये गुंतवल्यास तुम्ही एका वर्षात 36,000 रुपये गुंतवता. त्यानुसार तुम्ही 15 वर्षांत एकूण 5,40,000 रुपयांची गुंतवणूक केली. तर या रकमेवर तुम्हाला 13,16,850 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे 21 वर्षांनंतर म्हणजेच योजना परिपक्व झाल्यावर तुम्हाला 20,36,850 रुपये मिळतील.
5,000 रुपये मासिक गुंतवणूक :
तसेच तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत वार्षिक 60,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 5,000 रुपये योगदान द्यावे लागेल. या योगदानानंतर तुम्ही 15 वर्षांत 9 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण 16,46,062 रुपये व्याज मिळेल. त्याचवेळी मुदतपूर्तीनंतर तुम्हाला 25,46,062 रुपये मिळतील.
News Title – Sukanya Samriddhi Scheme
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कमी किंमतीत खरेदी करा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं निधन; संपूर्ण बॉलीवुडमध्ये शोककळा
“केएल राहुल शांत का राहिला?, त्यानं मालकाचं तोंड हाणायला पाहिजे होतं”
नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल; उद्धव ठाकरे कोणावर भडकले?
शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! तब्बल ‘इतक्या’ दिवस अवकाळी पावसाचा इशारा






