‘माझं वाटोळं झालं, हिशोब चुकता करणार’; सुजय विखेंनी सगळ्यांसमोर दिला इशारा

On: April 19, 2025 5:00 PM
Sujay Vikhe Patil
---Advertisement---

Sujay Vikhe Patil | लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Former MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील पराभवाचे विश्लेषण केले आहे. तालुक्यातील काही नेत्यांशी जवळीक ठेवणं हे आपल्या पराभवाचे आणि ‘वाटोळ्याचे’ कारण ठरल्याचे सांगत, आगामी काळात हिशोब चुकता करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सिंचन योजनांना गती देणार

श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव (Koregaon) येथील एका कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेबाबत (Sakalai Lift Irrigation Scheme) महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. या योजनेसाठी पाणी आरक्षित असून, ४९५ कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे (State Level Technical Committee) आहे व महिन्याभरात त्याला मंजुरी अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

पुढील तीन महिन्यांत योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन करण्याची जबाबदारी स्वतःची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कर्जत (Karjat), श्रीगोंदा आणि पारनेर (Parner) तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या डिंभे-माणिकडोह बोगद्याचे (Dimbhe-Manikdoh tunnel) कामही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या काळातच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sujay Vikhe Patil | पराभवाचं खापर नेत्यांवर

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धागा पकडत सुजय विखे म्हणाले, “श्रीगोंद्यामुळे माझा पराभव झाला हे सत्य आहे, पण मी जनतेवर नाराज नाही. मात्र, तालुक्यातील काही नेत्यांवर विश्वास ठेवल्याने आणि त्यांच्याशी जवळीक ठेवल्याने माझे वाटोळे झाले.” ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांची यादी मनात असून, आगामी निवडणुकीत हिशोब चुकता करू, असा इशाराही त्यांनी दिला.

“खासदारकी गेली तरी फरक पडत नाही, पण तालुक्याला मागे नेणारी चूक झाली,” अशी खंत व्यक्त करत, आता ही चूक सुधारून थेट जनतेशी संपर्क ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास बाळासाहेब मोहारे (Balasaheb Mohare), दादासाहेब साबळे (Dadasaheb Sable), बाळासाहेब गिरमकर (Balasaheb Giramkar) आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

News Title- Sujay Vikhe Patil Blames Local Leaders for Defeat, Vows Revenge

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now