Sujat Ambedkar Health | प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांना तळपत्या उन्हाचा त्रास झाला आहे. सध्याचं ऊन हे मानवाच्या शरीरासाठी धोकादायक आहे. सुजात आंबेडकर हे अकोल्यामध्ये प्रचारासाठी गेले असता त्यांना उन्हाचा त्रास झाल्याने त्यांना त्वरीत रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र सध्या सुजात यांची प्रकृती स्थिर असल्याचं स्वत: सुजात यांनी सांगितलं आहे. (Sujat Ambedkar Health)
“मी आंबेडकर जयंतीपासून पुन्हा एकदा प्रचारात सहभागी होणार”
“माझी तब्येत चांगली आहे. काळजी घ्यायचं काहीही कारण नाही. मी आंबेडकर जयंतीपासून पुन्हा एकदा प्रचारात सहभागी होणार आहे.”, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. “प्रचारात खंड पडू देऊ नका”, असं आवाहनही त्यांनी केलंय.
अकोल्यात एका आठवड्यात उन्हाचा पारा वाढला आहे. अकोल्यामध्ये 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं आहे. उन्हाचा फटका सुजात आंबेडकर यांना बसला आहे. यामुळे सुजात आंबेडकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुजात यांनी रूग्णालयात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. 14 एप्रिलनंतर आपल्या सर्वांमध्ये मी सामील होणार आहे, असं सुजात आंबेडकर म्हणालेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे अकोल्यामध्ये प्रचार करत आहेत. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून उभे राहणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर गावोगावी जात सभा घेत आहेत. वडिलांच्या प्रचारासाठी सुजात मतदारांना वंचित बहुजन आघाडीची भूमिका समजावून सांगत आहेत. बैठका, रॅली, पदयात्रा यावर त्यांनी भर दिला असून वंचितचे सोशल मीडिया सुजात सांभाळत आहेत. (Sujat Ambedkar Health)
वंचितची पाचवी यादी जाहीर
रायगडमधून कुमुदनी चव्हाण, नंदूरबारमधून हनुमंत कुमार सूर्यवंशी, धाराशीवमधून भाऊसाहेब अंधळकर, दिंडोरीतून गुलाब बरडे, जळगावमधून प्रफुल्ल लोढा, पालघरमधून विजय म्हात्रे, भिवंडीतून निलेश सांबरे, मुंबई नॉर्थमधून बीना सिंह, मुंबईच्या वायव्येला संजय कोलकरी, तर मुंबईच्या दक्षिण मध्य भागात अब्दूल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे. (Sujat Ambedkar Health)
News Title – Sujat Ambedkar Health Update
महत्त्वाच्या बातम्या
तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, अजित पवारांचे पन्नास टक्के उमेदवार आयात केलेले
‘या’ 4 गोष्टी आयुष्यात कितीही मिळाल्या तरी माणूस समाधानी होत नाही!
EPS योजना काय आहे? लाभ कोणाला मिळतो
20 हजारांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या ऑफर्स
अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट






