न्यायाधीशाला मॅनेज केल्याचा भुजबळांवर आरोप; कोणी केला आरोप?

On: October 26, 2024 10:52 AM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून हालचाली सुरु आहेत. आता राजकीय नेतेमंडळी देखील एकमेकांवर मोठमोठे आरोप करत आहेत. अशातच आता नाशिक जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष आहे. त्यामुळे आता सुहास कांदे भुजबळांवर मोठा आरोप केला आहे.

भुजबळ-कांदे संघर्ष पुन्हा पेटला :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यात भुजबळ-कांदे संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. कारण
समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भुजबळ-कांदे संघर्षाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून थेट छगन भुजबळ यांच्या समोरच शड्डू ठोकला आहे.

नाशिकमधील येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा देखील सुहास कांदे यांनी दिला आहे. याशिवाय सुहास कांदे यांनी थेट छगन भुजबळ कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर आरोप देखील केले आहेत.

Chhagan Bhujbal l सुहास कांदेंनी भुजबळांवर केले मोठे आरोप :

सुहास कांदे यांनी येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. यावेळी सुहास कांदे म्हणाले की, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी थेट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला मॅनेज करत छगन भुजबळ यांनी सुटका करून घेतली असा धक्कादायक आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.

याशिवाय समीर भुजबळ हे देखील मोठे गुंड आहेत. त्यामुळे त्यांना आता लोकांनीच तडीपार केल्याचा आरोप सुहास कांदेंनी केला आहे. याशिवाय महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटिसा देखील बजावल्या आहेत. त्यामुळे त्या नोटीस प्रकरणी सेटलमेंट करण्यासाठी त्यांनी मला देखील पैशाची ऑफर केली होती असा दावा देखील सुहास कादेंनी केला आहे.

News Title –  suhas kande aginst on chhagan bhujbal

महत्त्वाच्या बातम्या-

“विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, नीच लोकांना त्यांची जागा..”; सत्यजित तांबे संतापले

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; भाजप-शिंदे गटाविरोधात दिले ‘हे’ तगडे उमेदवार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची खालच्या पातळीवर टीका; संगमनेरमध्ये राजकारण पेटलं

आज मेष, वृषभसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा!

महायुतीचा मोठा डाव! आदित्य ठाकरें विरुद्ध उतरवला ‘हा’ बडा नेता

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now