“वाल्मीक कराडनेच मला…”, पोलिसांना सुदर्शन घुलेने सगळं स्पष्ट सांगितलं

On: March 27, 2025 6:11 PM
sudarshan ghule
---Advertisement---

Sudarshan Ghule | बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत बुधवारी मोठे घडामोडी घडल्या. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी खटल्याची केस ओपन करत तब्बल ३२ मिनिटांचा सविस्तर युक्तिवाद सादर केला. त्यांनी मुंबईतील 26/11 बॉम्बहल्ल्याचा संदर्भ देत कोर्टाला युक्तीवादाची गरज पटवून दिली.

खंडणीची मागणी, धमक्या-

निकम यांनी ‘आवादा’ (Avada) एनर्जी कंपनीच्या भूखंड खरेदीपासून खंडणीची मागणी, धमक्या आणि शेवटी देशमुख यांच्या हत्येपर्यंतची साखळी घटनाक्रमासह कोर्टात मांडली. त्यांनी सांगितलं की, आरोपी वाल्मीक कराड (Valmik Karad) याने ८ ऑक्टोबर २०२४ पासून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. शिवाजी थोपटे यांना धमकावलं गेलं आणि कंपनीला काम थांबवण्याची धमकीही देण्यात आली होती.

8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे याने वाल्मीक कराड याचा मेसेज सुदर्शन घुले याला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा.

पुराव्यांमध्ये सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपिंग सादर करण्यात आले. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. आरोपींनी हे कृत्य केल्यानंतर आनंद व्यक्त केल्याचंही फुटेजमधून समोर आलं.

आरोपीच्या वकिलांची मागणी आणि पुढील सुनावणी

वाल्मीक कराड यांच्या वकील विकास खाडे (Vikas Khade) यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितलं की, सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे – सीडीआर, लोकेशन डेटा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रं अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे योग्य तयारी न करता केस ओपन करणं योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांनी मागील तारखेलाही पुराव्यांसाठी अर्ज केला होता आणि आज पुन्हा तोच अर्ज सादर केला.

त्यावर न्यायालयाने आरोपीच्या वकिलांची मागणी मान्य करत सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. उज्ज्वल निकम यांनीही एक तासाच्या आत सर्व पुरावे देण्याचे आश्वासन दिले. यानंतर न्यायालयाने आरोपी पक्षाला वेळ देत पुढील सुनावणीची तारीख १० एप्रिल निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, या खटल्यातील गुंतागुंतीचा घटनाक्रम, संबंधितांचे बिनधास्त वर्तन आणि पोलिसांच्या प्राथमिक दुर्लक्षावरही कोर्टात प्रश्न उपस्थित झाले.

Title: Sudarshan ghule talks about walmik karad

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now