पावसाळ्यात आजारांना दूर ठेवा!, निरोगी राहण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

On: June 19, 2025 5:33 PM
Pune News
---Advertisement---

Monsoon Health Tips | राज्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात गारवा आला असला तरी आरोग्याच्या दृष्टीने ही काळजी घ्यायची गरज असते. कारण पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे सर्दी, ताप, विषाणू संसर्ग, डेंग्यू आणि मलेरियासारखे आजार पटकन होण्याचा धोका वाढतो. यासाठी काही सोप्या पण प्रभावी उपाय फॉलो करून आपण स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करू शकतो.

पावसात भिजल्यानंतर शरीर थंड होते, आणि त्यामुळे ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी अशा त्रासांना सामोरं जावं लागतं. तज्ज्ञ सांगतात की, हवेतील आर्द्रतेमुळे विषाणू आणि बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे पावसात शक्यतो भिजणं टाळा, आणि भिजल्यास त्वरित कोरडे कपडे घाला. कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Monsoon Health Tips)

फास्ट फूडपासून दूर रहा :

पावसाळ्यात अन्न पटकन खराब होतं. त्यामुळे विषबाधा, अतिसार, उलटी आणि टायफॉईडसारखे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी घरचं ताजं अन्न खा. बाहेरचं फास्ट फूड शक्यतो टाळा. पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर करूनच प्या. (Monsoon Health Tips)

तसेच पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. अंडरआर्म्स, पाय आणि कमरेच्या भागात सतत ओलावा राहिल्यास त्वचेला पुरळ, खाज आणि संसर्ग होतो. त्यामुळे कॉटनचे कपडे घाला, शरीर कोरडं ठेवा आणि अँटी-फंगल पावडर वापरा.

Monsoon Health Tips | सांधेदुखी असलेल्यांनी घ्या खास काळजी :

पावसाळ्यात लहान मुलं आणि वृद्ध नागरिक लवकर आजारी पडतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे भिजल्यावर तात्काळ कपडे बदला. मुलांना साचलेल्या पाण्यापासून दूर ठेवा. वृद्धांनी गरम पाणी प्यावं, वेळेवर औषधं घ्यावी आणि हलकं जेवण करावं. (Monsoon Health Tips)

या ऋतूमध्ये सांधेदुखी आणि कंबरदुखीची समस्या अधिक जाणवते. अशावेळी गरम पाण्याचा शेक घ्या, हलकासा व्यायाम करा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधं सुरू ठेवा.

News Title: Stay Healthy This Monsoon: Simple Tips to Prevent Infections, Dengue and Viral Fever

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now