‘या’ योजनेमुळे 20 व्या वर्षी तुमची लेक होईल 70 लाखांची मालकीण, आताच सुरू करा गुंतवणूक

On: February 8, 2024 2:33 PM
SSY Scheme
---Advertisement---

SSY Scheme | बाळाच्या जन्मानंतर आई-वडिलांना फक्त त्यांच्या संगोपणाची नव्हे तर त्यांच्या भविष्याचीही चिंता लागलेली असते. त्यात मुलींच्या लग्नाची चिंता तर त्यांना प्रचंड असते. आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावं यासाठी पालक प्रचंड मेहनत घेतात. भविष्यात मुलींच्या विवाहासाठी ते आतापासूनच पैशांची बचत करत असतात. मात्र आता सरकारने आणलेल्या एका स्कीममुळे पालकांचं याबाबतचं टेंशन काही प्रमाणात कमी होणार आहे.

सरकारची सुकन्या समृद्धी योजना (SSY), जी एक सरकारी हमी योजना आहे आणि विशेषत: मुलींचे भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने ती तयार करण्यात आली आहे. या योजनेचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता या योजनेत नेमके काय फायदे आहेत, त्यात कशी गुंतवणूक करायची यासंदर्भात तुम्हाला इथे सर्व माहिती मिळणार आहे.

या योजनेत तुम्ही वार्षिक 250 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता. जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने या योजनेसाठी सुकन्या खाते उघडू शकता. जेवढ्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकणार आहात.

सरकारच्या या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक 21 वर्षात परिपक्व होते. यामध्ये तुम्ही जर मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर या योजने अंतर्गत खातं उघडलं तर वयाच्या 21 व्या वर्षी तुमच्या मुलीसाठी 70 लाख रुपयांची गुंतवणूक तयार होईल. एवढी मोठी रक्कम मुलीच्या अनेक गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.

‘अशी’ करा गुंतवणूक

सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 12,500 रुपये गुंतवणुकीसाठी बचत करावे लागतील. यामुळे तुम्ही 15 वर्षात एकूण 22,50,000 रुपयांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर 8.2 टक्के व्याज आहे.

पुढे तुम्हाला 21 वर्षांच्या मुदतपूर्तीच्या वेळी एकूण 46,77,578 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशी एकूण तुमच्या मुलीला 22,50,000 रुपये आणि व्याजाचे 46,77,578 रुपये मिळून 69,27,578 (सुमारे 70 लाख रुपये) मिळतील. वयाच्या 21 व्या वर्षीच तुमच्या मुलीकडे तब्बल 70 लाख रुपये असतील.

योजनेसाठी खातं कुठे उघडणार?

सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा अधिकृत बँकेत खाते उघडू शकता. तुम्ही जर, 2024 मध्ये याचे खाते उघडले तर तुम्हाला 2045 मध्ये याचा लाभ प्राप्त होईल. या योजनेचा अजून एक फायदा म्हणजे, गुंतवणूकदार आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत करही वाचवू शकतात.

News Title-  SSY Scheme benefit of Rs 70 lakh to girls

महत्त्वाच्या बातम्या –

आता गुन्हेगारांना सुट्टी नाहीच…, पुण्याच्या नव्या पोलीस आयुक्तांनी घेतला धडाकेबाज निर्णय!

“तेव्हाच लोक आपल्यासोबत असतात…”, बुमराहनं व्यक्ती केली खदखद

बेरोजगारीवरून काँग्रेसची टीका; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी थेट आकडेवारीच सांगितली!

आज मी आणखीच श्रीमंत झालो; 12th नापास IPS अधिकाऱ्याच्या भेटीने आनंद महिंद्रा भारावले

पूनम पांडेवर सरकार मोठी जबाबदारी सोपवणार? आरोग्य मंत्रालयाने दिली अपडेट

Join WhatsApp Group

Join Now