दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

On: December 5, 2025 3:51 PM
Maharashtra Board Exams 2026
---Advertisement---

SSC & HSC Marksheet | माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट, मूळ प्रमाणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र किंवा स्थलांतर प्रमाणपत्र हरवल्यास आता मंडळाच्या कार्यालयात चक्कर मारण्याची गरज नाही. ही सर्व प्रमाणपत्रे आता थेट ऑनलाइन उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना फक्त ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. (SSC HSC Marksheet News)

शाळेच्या शिक्क्याची अट रद्द :

यापूर्वी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित माध्यमिक शाळेचा किंवा महाविद्यालयाचा शिक्का, तसेच मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीची गरज भासत होती. पण नवीन ऑनलाइन प्रणालीमध्ये ही अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. शाळेकडून शिफारसपत्र घेण्याची किंवा अतिरिक्त कागदपत्रे गोळा करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

राज्य मंडळाने संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करत विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता कोणत्याही शाखेतील विद्यार्थी सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकतात किंवा पोस्टाद्वारे प्राप्त करू शकतात. ( Maharashtra Board update)

SSC HSC Marksheet | ऑनलाइन अर्जाची पद्धत :

प्रमाणपत्रांसाठी अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक आणि त्याच्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर आवश्यक असेल. मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आधार OTPद्वारे प्रमाणीकरण केल्यानंतर विद्यार्थ्याला हवे असलेले प्रमाणपत्र निवडता येईल. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट केल्यानंतर ऑनलाइन शुल्क भरायचे आहे. त्यानंतर प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डाउनलोड करता येईल किंवा पोस्टाद्वारे पाठवले जाईल.

या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि वेगामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणारा जुना त्रास पूर्णपणे दूर झाला आहे. पूर्वी शाळेच्या शिफारसपत्रामुळे अनेकांना विलंब होत असे; मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी, एकसंध आणि त्वरित झाली आहे.

News Title: SSC-HSC Duplicate Certificates Now Fully Online in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now