निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

On: March 27, 2024 11:57 PM
Nita Ambani SRHvMI
---Advertisement---

#SRHvMI Nita Ambani | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. हैदराबादमध्ये फलंदाजांच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पाऊस पडला, समोरच्या गोलंदाजाला फोडून काढण्याची अक्षरशः स्पर्धाच दोन्ही संघांमध्ये लागली होती. यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये खरं मरण झालेलं दिसलं ते मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचं… त्यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पांड्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. नेटकऱ्यांनी नंतर मुंबईचे मालक अंबानी कुटुंबाला देखील सोडलं नाही.

अंबानी कुटुंब झालं ट्रोल-

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधार पदावरुन काढून टाकलं, त्याच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली. हार्दिकला गुजरातच्या संघातून परत बोलावण्यात आलं, त्यासाठी पैसे देखील मोजण्यात आलं.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मुंबईच्या संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय काही रुचला नाही. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाला सोशल मीडियातून जोरदार विरोध केला. परिणामी हार्दिक पांड्याला मुंबईच्या चाहत्यांचा रोष सहन करावा लागला. त्यानंतरही मुंबईने आपला निर्णय कायम ठेवला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात या साऱ्या गोष्टीची फळं मुंबईच्या संघाला दिसू लागली. हार्दिक पांड्याला भर मैदानात मुंबईच्या चाहत्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. त्यात या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे यात आणखीणच भर पडली. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तर अंबानी (Nita Ambani) ट्रोल झालेले पहायला मिळाले.

हैदराबादच्या सामन्यादरम्यान निता अंबानी ट्रोल-

हैदराबादने मुंबईविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या नोंद केली. निर्धारित २० षटकांमध्ये हैदराबादने २७७ धावा चोपल्या. मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई होत असताना हार्दिक तर ट्रोल होत होताच सोबत निता अंबानी सुद्धा ट्रोल झालेल्या पहायला मिळाल्या.

निता अंबानी (Nita Ambani) यांचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, त्यामध्ये निता अंबानी यांचा क्रिकेटमधला रस आता संपला आहे, अशा आशयाच्या पोस्ट पहायला मिळत आहेत. एकूणच आता हार्दिक पांड्यासोबत आता रोहित शर्माच्या फॅन्सची संघाच्या मालकांना देखील ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

 

 

News Title: SRHvMI Nita ambani photo viral

महत्त्वाच्या बातम्या-

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सर्वात मोठी बातमी! भाजपकडून खासदार नवनीत राणांना उमेदवारी जाहीर

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now