Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

On: March 27, 2024 8:53 PM
Hardik Pandya
---Advertisement---

SRHvMI | हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यामुळे मुंबईचे चाहते चांगलेच नाराज आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिकला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॅन्सच्या रागाचा चांगलाच सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान हार्दिक विरोधात मोठा रोष पहायला मिळाला होता. आता या प्रकाराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असलेली पहायला मिळत आहे.

हैदराबादमध्ये रोहितच्या चाहत्यांचा कहर-

मुंबई इंडियन्सचा IPL 2024 मधील दुसरा सामना हैदराबादमध्ये सुरु आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यात हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रोहित शर्माच्या चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता होती आणि ही शक्यता खरी ठरली आहे. हैदराबादमधील सामना सुरु होताच आता या प्रकाराचे व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत.

पहिला व्हिडीओ- प्रेक्षकांचा-

पहिला व्हिडीओ हा सामना सुरु होण्याआधीचा आहे. या व्हिडीओमध्ये खेळाडू मैदानावर प्रॅक्टिस करताना दिसत आहे. हैदराबादचं स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरलेलं आहे आणि “मुंबईचा राजा, रोहित शर्मा”, अशा घोषणा द्यायला सुरुवात झालेली दिसत आहे. त्यातच लोक रोहित शर्माच्या नावाचा गजर करताना दिसत आहेत. खाली तुम्ही व्हिडीओ पाहू शकता-

 

दुसरा व्हिडीओ- हार्दिक पांड्याचा-

दुसरा व्हिडीओ नाणेफेक वेळीचा आहे. या व्हिडीओत दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी मैदानात आलेले दिसत आहेत. नाणे आकाशात फेकले जाते आणि मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकते आणि हार्दिक पांड्या पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय जाहीर करतो. हार्दिक बोलत असताना प्रेक्षकांमधून जोरदार आवाज व्हायला सुरुवात होते, आवाज इतका मोठा असतो की हार्दिक पांड्याला नीट बोलता सुद्धा येत नाही. हार्दिकला साऱ्या गोष्टींची कल्पना असते, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हसरे असलेले दिसतात. खाली तो व्हिडीओ पाहू शकता-

 

तिसरा व्हिडीओ रोहित शर्माचा-

हैदरामधून तिसरा व्हिडीओ रोहित शर्माचा समोर आला आहे. सामन्याचं दुसरं षटक सुरु असताना कॅमेरा रोहित शर्मावर जातो आणि प्रेक्षकांकडून रोहित शर्माच्या नावाचा गजर सुरु होतो. प्रेक्षकांमधून येणारा आवाज इतका मोठा असतो की समालोचन करणारे सुद्धा चकीत होतात. खाली तो व्हिडीओ तुम्ही पाहू शकता-

 

News Title: SRHvMI Hardik Pandya and Rohit Sharma Videos

महत्त्वाच्या बातम्या-

‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सर्वात मोठी बातमी! भाजपकडून खासदार नवनीत राणांना उमेदवारी जाहीर

“30 तारखेपर्यंत…”; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत; ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी

मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर अन् वसंत मोरे दिसले एकत्र, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now