चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

On: April 5, 2024 12:32 AM
SRH vs CSK Match
---Advertisement---

SRH vs CSK l आयपीएल 2024 हंगामातील 18 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हैदराबादला त्याच्या घरच्या मैदानावर दुसऱ्या सामन्यात चेन्नईचा सामना करावा लागणार आहे. यापूर्वी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही डावात 523 धावा झाल्या होत्या. या सामन्यात यजमान हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.

कोणता संघ बाजी मारणार? :

जर आपण या दोन्ही टीमबद्दल बोललो तर, CSK ने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. त्यामुळे CSK चा संघ हा सध्या चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादने तीन सामने खेळले असून, संघाने फक्त एकच जिंकला आहे आणि दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तसेच या सामन्यातील विजयासह CSK ला टॉप 2 मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. SRH ला टॉप 4 मध्ये प्रवेश करण्याची संधी असेल. मात्र हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रंजक होणार हे जवळपास निश्चित आहे.

SRH vs CSK l दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू :

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य शिलेदार :

राहुल त्रिपाठी, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य शिलेदार :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथीराना.

News Title : SRH vs CSK Team Prediction

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार?; हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?; महत्त्वाची अपडेट समोर

सख्ख्यांनी साथ सोडली, मात्र कुटुंबातील ‘ही’ व्यक्ती अजित पवारांच्या मदतीला धावून आली!

मोठी बातमी! ‘या’ बड्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा

दिल्लीला ‘ती’ चूक पडली भारी!, ऋषभ पंतसह संघावर मोठी कारवाई

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now