दक्षिण मुंबईत भाजपचा पत्ता कट, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळालं लोकसभेचं तिकीट

On: April 30, 2024 6:57 PM
South Mumbai Loksabha Shinde Group Announce Yamini Jadhav As Lok Sabha Election Candidate
---Advertisement---

South Mumbai Loksabha | महायुतीमधील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. या जागेवर भाजपने दावा केला होता. येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांना भाजपकडून तिकीट दिलं जाणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र या जागेवर शिवसेनेने बाजी मारली आहे.

लोढा आणि नार्वेकर यांचं नाव चर्चेत असताना शिवसेनेने येऊन बाजी मारली. दक्षिण मुंबई हा मुंबईतला महत्त्वाचा मतदारसंघ आता शिवसेनेला मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामिनी जाधव यांच्यावर विश्वास टाकत त्यांना या मतदार संघाचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे यामिनी जाधव या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत.

महाविकास आघाडीकडून या जागेवर ठाकरे गटाचे अरविंद सावंत उभे राहिले आहेत. या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. अखेर या मतदारसंघाचा तिढा आज (30 एप्रिल) सुटला. या जागेवर शिंदे गटाच्या नेत्याला उमेदवारी मिळाली आहे.

कोण आहेत यामिनी जाधव?

यामिनी जाधव या मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. यामिनी जाधव यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली होती. या चर्चेतच यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं बोललं जातंय. अखेर आज अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक जारी करत त्यांची उमेदवारी (South Mumbai Loksabha ) जाहीर करण्यात आली.

यामिनी जाधव या सध्या भायखळा विधानसभेच्या आमदार असून त्यांनी नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. 2012 साली प्रथम त्या मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघातून यामिनी जाधव यांनी बाजी मारली. त्यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांचा पराभव केला.

गुवाहाटीला जाणाऱ्या यादीत यामिनी जाधव पहिल्या

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा सर्व आमदार हे गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव होत्या. त्यांचे पती यशवंत जाधव यांच्यावर ईडी कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या मालमत्तांवर तब्बल चार दिवस छापे सुरू होते. मात्र, जेव्हा यामिनी जाधव या गुवाहाटीला गेल्या त्यानंतर यशवंत जाधव यांच्या विरोधातील चौकशी थांबली होती. यावरून बरीच टीका देखील झाली होती. आता त्यांना थेट लोकसभेसाठी (South Mumbai Loksabha ) तिकीट देण्यात आलंय.

News Title –  South Mumbai Loksabha Shinde Group Announce Yamini Jadhav As Lok Sabha Election Candidate  

महत्त्वाच्या बातम्या-

‘कृषीमंत्री असताना पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?’; मोदींचा पवारांवर पुन्हा हल्लाबोल

“माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता..”

नीतू कपूरने सांगितली ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा, म्हणाल्या…

अजित पवारांना धक्का!; सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सख्ख्या भावानेच घेतला आक्षेप

मुंबईकरांना झटका!; आदित्य ठाकरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Join WhatsApp Group

Join Now