मैदानावर पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की, चाहते म्हणाले ‘इतका माज बरा नाही’

On: March 25, 2024 12:03 AM
---Advertisement---

MI vs GT | आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील पाचव्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमने सामने आले होते. गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या. गुजरातने यासह हा सामना 6 धावांनी जिंकला. गुजरातच्या या विजयासह शुबमन गिल याने कर्णधार म्हणून विजयी सुरुवात केलीय. मात्र परंपरेनुसार मुंबई इंडियन्सने हा सामना गमावला. मात्र या सामन्यादरम्यान पंड्याने मैदानात रोहित शर्मासोबत असं काही  केलं  ज्यामुळे नेटकरी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की,

सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचा संघ रोहित शर्माचा आदर करायचा विसरला का? असा सवाल चाहत्यांनी केला आहे.

हार्दिक पंड्या रोहित शर्माला एकदा नाहीतर चार वेळा जागा बदलल्याचं पाहायला मिळालं. पंड्या रोहितवर ओरडल्यासारखा बोलला. हे मात्र चाहत्यांना पटलं नाही. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा हार्दिक ट्रोल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

चाहत्यांनी हार्दिकला डिवचलं

सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या (Rohit Sharma vs Hardik Pandya) चाहत्यांनी डिवचलं. हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी आला तेव्हा चाहत्यांनी रोहित रोहित रोहित अशी घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला.

मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिकच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली होती. त्यामुळेच चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्याला चाहत्यांनी डिवचलंय.

 

पंड्याने मैदानात असं काही  केलं की ज्यामुळे नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now