12 आमदारांबाबत अखेर कोश्यारींनी सोडलं मौन!

On: February 21, 2023 4:30 PM
---Advertisement---

मुंबई | पदमुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) आणि ठाकरेें यांच्यात आमदार नियुक्तीवरुन वाद निर्माण झाल्याचं आपण सर्वानी पाहिलं आहे. अनेकदा या बारा आमदारांच्या नियुक्तीवरुन राजकारणदेखील चांगलेचं तापल्याचं पहायला मिळालं. अशातच आता माजी राज्यपाल कोश्यारी यांनी या आमदार नियुक्तीवरुन गौप्यस्फोट केला आहे.

बारा आमदारांची जेव्हा नियुक्ती (appointment) करायची होती त्यावेळ एक अशोभनीय घटना घडली. असं कोश्यारी म्हणालं. त्या 12 आमदारांच्या फाईलवर सही करण्याची धमकी मला देण्यात आली होती. पुढच्या 15 दिवसांत फाईलवर सही करा असं मला सांगण्यात आलं होत, असा गौप्यस्फोट कोश्यारींनी केला आहे.

मुख्यमंत्रीपदावर बसलेला व्यक्ती असं करु शकतो का? असा सवाल देखील त्यांनीउपस्थित केला. त्या यादीतील कोणत्याही नावाला माझा आक्षेप नव्हता. माझा आक्षेप पत्रातील भाषेवर होता. तसेच मविआ नेत्यांनी ती नावं वारंवार बदलली. प्रश्न असा आहे की या यादीवर सही करा असा आदेश राज्यपालांना कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळं मी सही केली नाही.

राज्यापाल तुमचा नोकर नाही आहे तुम्ही सांगाल ते करायला असा संतापदेखील कोश्यारींनी व्यक्त केला आहे. 2019 च्या अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीवेळी नेमका कसा घडला? यावर उत्तर देताना सरकार बनवण्यासाठीचं लागणारे आकडे त्यांच्याकडे होते ते त्यांनी माझ्यासमोर सादर केले. त्यावेळी सकाळचा शपथविधी घेण्याचा विचार अजित पवारांनी (Ajit Pawar) व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now