…भर स्टेडिअमवर स्मृतीच्या बॉयफ्रेंडने मारली घट्ट मिठी; फोटो तुफान व्हायरल

On: March 18, 2024 1:22 PM
Smriti Mandhana Boyfriend Palash Muchhal
---Advertisement---

Smriti Mandhana Boyfriend Palash Muchhal l भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून महिला प्रीमियर लीग (WPL) विजेतेपद पटकावले आहे. चॅम्पियन बनल्यानंतर टीम जल्लोष करण्यात व्यस्त असताना मैदानावर एक व्यक्ती दिसली, ज्याने स्मृती मंधानाला मिठी मारली आणि तिचे अभिनंदन केले. मात्र ती व्यक्ती कोण होती याबाबत प्रेक्षक अनेक तर्क लावत आहे.

Smriti Mandhana Boyfriend Palash Muchhal l मिठी मारणारा व्यक्ती हा स्मृतीचा बॉयफ्रेंड :

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवल्यानंतर स्मृती मंधानाला मिठी मारणारा व्यक्ती हा तिच्या बॉयफ्रेंड पलाश मुच्छाल (Palash Muchhal) हा होता. मात्र विजय मिळवल्यानंतर आता या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

असे म्हणतात की विजय फक्त प्रियजनांसोबत साजरा केला जातो. संघ चॅम्पियन झाला तेव्हा तिचा प्रियकर पलाश मुच्छाल मैदानावर उपस्थित होता. त्यांनी स्मृती यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि तिला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्याचे दिसत आहेत.

https://twitter.com/RcbianOfficial/status/1769440574166192538

Smriti Mandhana Boyfriend Palash Muchhal l स्मृती आणि पलाश सोशल मीडियावर सक्रिय :

पलाश अनेकदा स्मृती मानधनासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. क्रिकेटच्या कॉरिडॉरमधील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती यांचा समावेश आहे. त्यांचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत. पलाश आणि स्मृती यांच्या नात्याची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा गायकाने 2023 मध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये क्रिकेटरला गाणे समर्पित केले होते.

पलाश म्हणाला होता; स्मृती मी पण तुझ्यावर प्रेम करतो…. इंदूरचा राहणारा पलाश गायनासोबतच दिग्दर्शनातही सक्रिय आहे. या कपलमध्ये एक अप्रतिम बॉन्डिंग आहे.

सामन्यानंतर कोहलीने केले स्मृतीचे कौतुक :

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. कोहलीने RCB महिला कर्णधार स्मृती मानधनासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. तिने RCB महिला खेळाडूंना ‘सुपर वुमन’ म्हणून संबोधले, हजारो फ्रेंचायझी चाहत्यांनी सोशल मीडियावर खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

News Title : Smriti Mandhana Boyfriend Palash Muchhal

महत्त्वाच्या बातम्या –

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज

Vivo कंपनीच्या या सीरीजवर मिळतोय बंपर डिस्काउंट; या तारखेपर्यंत खरेदी करू शकता

मोठी बातमी: इलेक्टोरल बाँडवर ‘सर्वोच्च’ सुनावणी; CJI म्हणाले, “SBI ला माहिती द्यावीच लागेल”

तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now