स्मृती मानधनाला मोठा झटका; भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ

On: December 24, 2025 1:58 PM
Smriti Mandhana
---Advertisement---

Smriti Mandhana | भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात दमदार कामगिरी करत सात विकेट्सनी विजय मिळवला. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने अवघ्या 11.5 षटकांत 129 धावांचे लक्ष्य सहज पार केले. या विजयाची सर्वात मोठी नायिका ठरली सलामीवीर शफाली वर्मा.

शफाली वर्माने (Shafali Verma) अवघ्या 27 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत नाबाद 69 धावांची स्फोटक खेळी केली. तिच्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. या कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

स्मृती मानधनाला मागे टाकत शफालीचा नवा विक्रम :

हा शफाली वर्माचा टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आठवा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार ठरला. यासह तिने स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि जेमिमा रॉड्रिग्स या दोघींनाही मागे टाकले. स्मृती मानधना आणि जेमिमा यांनी आतापर्यंत प्रत्येकी सात वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.

स्मृती मानधनाने भारतासाठी तब्बल 155 टी-20 सामने खेळले असतानाही शफालीने कमी सामन्यांत तिला मागे टाकल्याने हा धक्का मानधनासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम अजूनही मिताली राजच्या नावावर आहे.

Smriti Mandhana | सामन्यात नेमकं काय घडलं? :

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 128 धावा केल्या. हर्षिता समरविक्रमाने 33 तर कर्णधार चमारी अथापथूने 31 धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. (Smriti Mandhana News)

प्रत्युत्तरात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामना एकतर्फी केला. शफाली वर्मासोबत जेमिमा रॉड्रिग्सने 26 धावांची साथ दिली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असून पुढील सामना 26 डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे.

News Title: Smriti Mandhana Faces Setback as Shafali Verma Creates New Record in Women’s T20

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now