पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करताय?; तर चुकूनही ‘या’ चुका करू नका

On: April 3, 2024 4:30 PM
---Advertisement---

SIP Investment Tips l सध्या गुंतवणूकदारांची पहिली पसंती एसआयपी आहे. कारण गुंतवणूकदार SIP मध्ये गुंतवणूक करण्यास फारच उत्सुक असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ते करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

रिसर्च केल्याशिवाय एसआयपीमध्ये गुंतवणूक करू नका :

SIP मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही योग्य संशोधन करणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही तज्ञ् सल्लागाराचा सल्ला घेणे देखील फायद्याचे ठरते. संशोधनाशिवाय कोणत्याही फंडात पैसे गुंतवू नयेत. कारण यामुळे तोटा होण्याची दाट शक्यता असते.

तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा. तुम्ही कोणताही SIP चा निर्णय फक्त त्याचे रिटर्न्स पाहून कधीही घेऊ नये. कारण कधी कधी चांगला परतावा देणारे एसआयपीचे रिटर्न्सने देखील तोटा होऊ शकतो.

SIP Investment Tips l SIP मध्ये वेगवेगळ्या फंड आणि सेक्टरमध्ये पैसे गुंतवावेत :

गुंतवणूकदार वेळोवेळी एसआयपी बंद करत राहतात. कधी ही थांबवतात आणि कधीही सुरु करतात. मात्र असे करू नये, कारण असे केल्याने गुंतवणूकदारांना पूर्ण लाभ मिळत नाही. त्याचबरोबर अनेकवेळा नुकसान देखील सहन करावे लागते.

याशिवाय तुम्ही एसआयपीमध्ये वेगवेगळ्या फंड आणि सेक्टरमध्ये पैसे गुंतवावेत, जेणेकरून एखादा फंड किंवा सेक्टर नकारात्मक झाल्यास तुमच्या पोर्टफोलिओवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे की, SIP मध्ये गुंतवलेली रक्कम खूप कमी किंवा जास्त असू नये. ते तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम सहनशीलतेनुसार असावी. जर तुम्ही खूप कमी पैसे गुंतवलेत तर तुम्हाला तेवढा चांगला परतावा मिळणार नाही.

News Title – SIP Investment Tips In Marathi

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागांना बसणार फटका

तिसऱ्या लग्नानंतरही शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केले धक्कादायक कृत्य

लोकसभा निवडणुकीबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

घर बांधण्याचं स्वप्न महागणार? सिमेंटच्या किंमती ‘तब्बल’ एवढ्या रुपयांनी वाढणार

आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now