सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार; पण वडिलांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

On: March 13, 2024 7:39 AM
Sidhu Moose Wala
---Advertisement---

Sidhu Moose Wala | प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आज हयात नसला तरी त्याचे नाव सातत्याने घेतले जात आहे. आपल्या गायनाने सर्वांची मने जिंकणारा सिद्धू मूसेवाला आता या जगात नसला तरी त्याची सर्वत्र चर्चा आहे. आजही चाहते त्याची गाणी ऐकतात आणि त्याचा आवाज कानावर पडताच चाहत्यांनी त्यांना गायकाची आठवण येते. सिद्धू मूसेवाला या जगात नसला तरी त्याच्या घरी आता नव्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे.

काही काळापूर्वी सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर गर्भवती असल्याचे समोर आले होते आणि त्यासाठी त्यांनी आयव्हीएफची मदत घेतली होती. जेव्हापासून सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर यांच्या गरोदरपणाची बातमी समोर आली, तेव्हापासून मूसेवालाचे चाहते खूप खूश आहेत आणि ते मूसेवाला कुटुंबाचे अभिनंदन करत आहेत.

मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार

सिद्धू मूसेवालाची आई रुग्णालयात दाखल असून लवकरच त्या पुन्हा आई होऊ शकतात. आता सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी यावर प्रतिक्रिया दिली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. माहितीनुसार, सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर सध्या रुग्णालयात दाखल असून त्या कधीही आई होऊ शकतात.

सिद्धू मूसेवालाच्या आईने जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. खरं तर आता सिद्धू मूसेवालाच्या फॅनपेजवर चरण यांच्या तब्येतीबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण यादरम्यान, सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनीही याबाबतची सत्यता सांगितली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.

Sidhu Moose Wala च्या वडिलांची माहिती

सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी सोशल मीडियावरील सर्व अफवांना पूर्णविराम देत लिहिले की, मी सिद्धूच्या चाहत्यांचा आभारी आहे, ज्यांना आमच्या कुटुंबाची काळजी आहे. पण आमच्या कुटुंबाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. आम्ही तुमच्याशी शेअर करू.

सिद्धू मूसेवाला हा गायक आणि एक प्रसिद्ध चेहरा होता. 29 मे 2022 रोजी सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कटाचा भाग म्हणून त्याला गोळ्या झाडण्यात आल्या आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याला 24 गोळ्या लागल्या. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.

News Title- Sidhu Moose Wala’s mother Charan Kaur is admitted to the hospital and she will give birth to twins soon
महत्त्वाच्या बातम्या –

रहाणे म्हणजे शिस्त…! शतकाची हुलकावणी पण अजिंक्यच्या कृतीनं जिंकलं मन, VIDEO

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना संधी!

‘कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी’; भाजपकडून फाटक्या साड्यांचं वाटप

बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

“फडणवीस यांच्या डोक्याला…”, मनोज जरांगेंचा गंभीर इशारा

Join WhatsApp Group

Join Now