Health Updates l रिकाम्या पोटी चहा पिण्याचे हे आहेत दुष्परिणाम; नक्की वाचा

On: January 6, 2024 9:15 AM
Health Updates
---Advertisement---

Health Updates l आपल्याकडे बहुसंख्य लोक हे सकाळी झोपेतून उठले की सर्वात आधी चहा पितात. तर चहा प्यायल्याशिवाय काही जणांच्या दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते. चहा पिणाऱ्यांची संख्या हि सध्याच्या घडीला इतर देशांपेक्षा जास्त आहे. मात्र, चहा किंवा कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी किती हानिकारक आहे किंवा त्याचा शरीरावर किती परिणाम होतो याचा थोडा देखील विचार चहाप्रेमी करत नाहीत.. याचा चहाचे काय होतात आपल्या शरीरावर परिणाम? याचा अतिसेवनामुळे नेमके काय तोटे होऊ शकता हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

Health Updates l चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे :

आरोग्य तज्ज्ञांकडून मिळालेला माहितीनुसार, चहा आणि कॉफीमध्येही अनेक प्रकारचे टॅनिन आढळते. त्यामुळे कुठेतरी आपल्या शरीराच्या विकासात अडथळा येतो. एवढेच नव्हे तर चहामध्ये आढळणारे टॅनिन हे अन्नातून मिळणारे लोह आणि आवश्यक पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतात. त्यामुळे मनुष्याच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा बरोबर होत नाही. यासाठी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका असे सांगतले जाते.

Health Updates l शरीरात वाढते डिहायड्रेशन :

मनुष्याने रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तर घरगुती चहामध्ये (Side effects of drinking tea on an empty stomach)  असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे मनुष्याला वारंवार लघवीची समस्या उद्भवते. तुम्ही पुरेसे पाणी न पिल्यास डिहायड्रेशन होते. असे आहारतज्ञाने सांगतले आहे.

Health Updates l अॅसिडीटी :

सकाळ-सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते. तर त्यापेक्षा गंभीर म्हणजे अश्यावेळी अल्सरचा त्रास देखील वाढतो. हे अनेकदा चहामध्ये असलेल्या ऍसिडमुळे होते. यासाठी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे असे सांगतले जाते.

Health Updates l पचनप्रक्रिया :

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने मनुष्याच्या मेटाबॉलिज्मवर अतिगंभीर परिणाम होतो. तर यामुळे पचनक्रियाही बिघडते. यासाठी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.

महत्त्वाच्या बातम्या-

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now