शुभमन गिल सारासोबत ब्रेकअप करून ‘या’ तरुणीच्या प्रेमात दंग

On: April 24, 2024 11:45 AM
Shubman Gill Marriage
---Advertisement---

Shubman Gill Girlfriend l टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू शुभमन गिल त्याच्या दमदार खेळीमुळे कायमच चर्चेत असतो. शुभमन गिल सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करत आहे. अशातच आता शुभमन गिल पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो त्याच्या खेळीमुळे नाहीतर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे.

शुभमन आणि साराचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण :

सध्या सोशल मीडियावर शुभमन गिल आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर शुभमनचा ब्रेकअप झाल्यानंतर तो एका स्पॅनिश तरुणीच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शुभमन गिलच्या स्पॅनिश गर्लफ्रेंडचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर एका युजरने शुभमन गिलच्या पर्सनल लाइफबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या युजरने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, शुभमन गिल मारिया अरोयोग नावाच्या स्पॅनिश मुलीला डेट करत आहे. सर्वात गमतीशीर बाब म्हणजे या युजरने इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सच्या यादीच्या स्क्रीनशॉटसह स्टेडिअममधील शुभमनच्या कथित गर्लफ्रेंडचा फोटो देखील शेअर केला आहे.

https://twitter.com/i/status/1780643178431049987

Shubman Gill Girlfriend l मारिया अरोयोग कोण आहे? :

क्रिकेटर शुभमन गिलच्या नवीन स्पॅनिश गर्लफ्रेंडचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्पॅनिश तरुणी मारिया अरोयोग ही शुभमन गिलची एक्स गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मारिया अरोयोग ही गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यादरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसली आहे. तसेच स्पॅनिश तरुणीला स्क्रिनवर पाहून शुभमन गिलच्या चेहऱ्यावर देखील हावभाव बदलल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

क्रिकेट विश्वातील प्रिन्स म्हणजेच शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यातील रिलेशनशिपबाबत कित्येक काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत. तसेच शुभमन आणि सारा तब्बल 4 वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. हे दोघेही जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याने या अफवांना आणखी प्रोत्साहन मिळाल आहे.

News Title : Shubman Gill Girlfriend Maria Arroyog

महत्त्वाच्या बातम्या-

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाईक घ्यायची? तर भन्नाट फीचर्ससह ‘ही’ नवीन बाईक येतेय बाजारात

‘अमरावतीत हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?,संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

“पैशाची मस्ती आलीये काय?, निवडणूक आहे म्हणून थांबलोय, नाहीतर..”; बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

मिंध्यांना वाटतं की सगळं काही पैशाने विकत घेता येतं; भरपावसात उद्धव ठाकरे कडाडले

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now