अजित पवारांना धक्का!; सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर सख्ख्या भावानेच घेतला आक्षेप

On: April 30, 2024 4:44 PM
Shrinivas Pawar criticizes Ajit Pawar on Sunetra Pawar candidature
---Advertisement---

Shrinivas Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपचा हात धरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आता दोन गट पडले आहेत. शरद पवारांशी विभक्त झाल्यापासून अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून एकमेकांवर निशाणा साधला जातो. त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे तर हे वाद अजूनच वाढले आहेत.

अशात अजित पवार यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांनी पुन्हा एकदा अजित दादांवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही त्यांनी आपली  नाराजी जाहीर केली होती. शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांनी चूक केली, असं ते म्हणाले होते. आता बारामतीच्या निवडणुकीवरून त्यांनी मोठं भाष्य केलं आहे.

श्रीनिवास पवार यांचा सुनेत्रा पवारांना विरोध

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना होणार आहे. या ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार आहे. या पार्श्वभूमीवरच श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

“अजित पवार माझे मोठे भाऊ आहेत. जेव्हा ते अडचणीत असतात तेव्हा मी नक्कीच त्यांना पाठिंबा देतो. पण जेव्हा त्यांची पत्नी ही सुप्रिया विरोधात उभी राहिली. ते कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. म्हणून मी आज साहेबांसोबत  आहे.”, असं श्रीनिवास पवार म्हणाले आहेत.

तसंच पुढे ते म्हणाले की, निवडणूक असली तरी कुटुंबात कोणतीही फुट पडलेली नाही. तुम्ही हे निवडणुकीनंतर पाहूच शकता. राजकीय पातळीवर नाही पण, आम्ही केवळ कुटुंब म्हणूनच एकत्र येऊ. श्रीनिवास पवार यांचा हा दावा आता कितपत ठरा ठरतो, हे निवडणुकीनंतर दिसून येईलच.

कोण आहेत श्रीनिवास पवार?

श्रीनिवास पवार(Shrinivas Pawar)  हे अजित पवार (Ajit Pawar) यांचे मोठे बंधू असून ते उद्योजक तथा कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. ते राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसून आले आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यापासून श्रीनिवास पवार सतत त्यांच्यावर टीका करताना दिसून आले आहेत.

News Title-  Shrinivas Pawar criticizes Ajit Pawar on Sunetra Pawar candidature

महत्त्वाच्या बातम्या –

Samsung च्या ‘या’ लेटेस्ट स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; किंमत ऐकून वेडे व्हाल

“गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय”; राऊतांचा मोदींवर पलटवार

ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेनबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा!

प्रसिद्ध अभिनेत्रीचा शरद पवार गटात प्रवेश, पहिल्याच भाषणात सरकारवर जोरदार हल्लाबोल

पंकजा मुंडेंबाबत धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Join WhatsApp Group

Join Now