वाढदिवसाच्या दिवशीच श्रीकांत शिंदे सापडले मोठ्या अडचणीत!

On: February 5, 2024 8:42 PM
Shrikant Shinde Birthday
---Advertisement---

Shrikant Shinde Birthday | राज्यामध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांआधी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळला त्याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडल्या. ही घटना घडते न घडते तोवर उल्हासनगर येथे हिललाईन येथे गणपत गायकवाड या भाजपच्या आमदारांनी महेश गायकवाडवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर पुण्यातील एका गुंडानं श्रीकांत शिंदेंवर शुभेच्छांचा (Shrikant Shinde birthday) वर्षाव केला.

पुणे हे विद्येचं माहेरघर असून या पुण्यामध्ये सध्या टोळीयुद्धाला सुरूवात होण्याबाबत चर्चा होती. अशातच गुंड आणि राजकीय नेते यांचे अनेकदा समीकरण पाहायला मिळत आहे. पुण्यातील अनेक नेत्यांसोबत कुख्यात गुन्हेगारांचे फोटो व्हायरल झाले होते. अशातच आता पुण्यातील हेमंत दाभेकर या गुन्हेगाराचा श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देतानाचा फोटो व्हायरल झाला. यामुळे विरोधकांकडून आक्रमक टीका होताना दिसत आहेत.

राऊतांकडून ट्विट

श्रीकांत शिंदेंना पुण्यातील हेमंत दाभेकर या गुन्हेगाराने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या हातातील पुष्पगुच्छ देताना त्यानं शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून संजय राऊत यांनी यांनी ट्विट केला आहे. “गुंडांचे इतके बळ का वाढले आहे? काल बाळराजे यांचा वाढदिवस होता. यादिवशी वर्तुळातील व्यक्ती कोण शोध घ्या”?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“गुंडाराज सुरू”

सध्या गुंडाराज सुरू आहे. पोलीस ठाण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करत आहेत. या परिस्थितीला जबाबदार कोण? राज्यातील गुंडाशाहीला कोण पोसत आहेत ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

कोण आहे हेमंत दाभेकर?

फोटोमधील श्रीकांत शिंदे यांच्या शेजारी उभी राहिलेली व्यक्ती ही कुख्यात गुंड आहे. शरद मोहोळचा साथीदार म्हणून किशोर मारणे प्रकरणामध्ये साथीदार होती. किशोर मारणे प्रकरणामध्ये शरद मोहोळला जन्मठेप देण्यात आली होती आणि त्यावेळी हेमंत दाभेकर यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे भेट

काही दिवसांआधी अजित पवार गटाचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे याची पुण्यामध्ये जाऊन भेट घेतली होती. यामुळे राज्य भरामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावेळी पार्थ पवार यांनी कोथरूड मतदारसंघाचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांची गजा मारणे आणि पत्नी जयश्री मारणे यांची भेट झाली. त्यावेळी पार्थ पवारांना पुष्पगुच्छ देत स्वागतही केलं.

News Title – Shrikant Shinde Birthday In Hemant Dabhekar

महत्त्वाच्या बातम्या

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका

Join WhatsApp Group

Join Now