Shreyas Talpade | “मी तर मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयस तळपदेनं सांगितली धक्कादायक आपबीती

On: January 3, 2024 7:27 PM
Shreyas Talpade
---Advertisement---

Shreyas Talpade| बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Sreyas Talpade ) आताच एका मोठ्या संकटातून बाहेर पडला आहे. खरं तर त्याला दुसरा जन्मच मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूट सुरु असताना अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी निघून गेला. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचं  म्हटलं गेलं. त्यामुळे तो बरेच दिवस रुग्णालयातच होता. या कठीण प्रसंगातून आता तो आणि त्याचं कुटुंब सावरलं आहे. या सर्व आपबितीबाबत त्याने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

Shreyas Talpade नं सांगितली आपबीती

माध्यमांशी संवाद साधताना Shreyas Talpade म्हणाला की, “सध्या मी 47 वर्षांचा आहे. मात्र, एवढ्या वर्षांत मी कधीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो नाही. माझ्या कुटुंबातील अनेकांना यापूर्वीही हृदयविकाराची समस्या झाली आहे. मी पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मला जाणवलं की, जीव आहे तर सगळं काही आहे. मी माझ्या वयाच्या 20 व्या वर्षापासून काम करतोय. सध्या मी 47 वर्षांचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझं खूप व्यस्त शेड्यूल होतं. या धावपळीमुळे मला खूपच थकवा जाणवत होता. त्यामुळे मी माझ्या शरीराची तपासणी करून घेतली.”

पुढे बोलताना श्रेयस म्हणाला की, “मी माझ्या ‘वेलकम टू द जंगल’या चित्रपटाचे शुटींग करत होतो. या दरम्यान मी मिलिट्री एक्सरसाइज केली होती. मात्र, मध्येच माझा डावा हाथ फारच दुखायला लागला. मला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. हा त्रास एवढा प्रचंड होता की, मला माझ्या व्हॅनिटी पर्यंतही पोहोचता आलं नाही. या अवस्थेत मी माझ्या घरी पोहोचलो.”

पत्नी दीप्तीने माझी अशी अवस्था बघून लगेच हॉस्पिटल गाठलं. काही मिनिटे मी क्लीनिकली डेड झालो होतो. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत सीपीआर ट्रिटमेंट देत मला जिवंत केलं. “माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, मला माफ कर”, असं मी माझ्या पत्नीला त्यावेळी म्हणत होतो.

Shreyas Talpade चा चाहत्यांना सल्ला

“मी धूम्रपान किंवा मद्यपान करत नाही. एवढं करूनही जर माझ्यासोबत असं होऊ शकत असेल, तर धुम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांचं काय होत असेल याची कल्पना करा. मी ऐकलंय की कोरोनानंतर बऱ्याच जणांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे”, असा मोलाचा सल्लाही यावेळी श्रेयसने (Shreyas Talpade) दिला. तसेच, या कठीण प्रसंगी साथ दिल्याबद्दल त्याने पत्नी दीप्ती, चाहते आणि सर्वांचे आभारही मानले.

Sreyas Talpades first reaction after suffering a heart attack

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून Aishwarya Rai ने अभिषेकचं घरं सोडलं?; व्हिडीओमुळे अखेर सत्य समोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य!

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या शिबिराला ‘या’ नेत्याची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Adani Group | हिंडनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अदानींना मोठा दिलासा!

Munawar Faruqui | ‘त्याला पोरींसोबत…’; अंजली अरोराचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Join WhatsApp Group

Join Now