“अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि मिळवा…”

On: December 30, 2022 6:29 PM
---Advertisement---

मुंबई | शिंदेंच्या बंडापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. या बंडापासून शिंदे-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

’50 खाके एकदम ओके’ म्हणत ठाकरे गट शिंदे गटावर निशाणा साधत असतो. तर ठाकरेंना ‘आळशी’ म्हणत शिंदे गट ठाकरे गटावर टीका करत असतो.

त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) ठाकरेंवर अनोख्या पद्धतीनं टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. शिंदे म्हणाले आहेत की, अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा. यामुळं आम्ही मुख्यमंत्रीच बदलला असा टोला शिंदेनी उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) लगावला आहे.

दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकामंध्ये आरोप-प्रत्यारोपाचा कलगितुरा रंगल्याचे दिसून आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now