धक्कादायक! Sharad Mohol च्या हत्येअगोदर आरोपींनी ‘या’ ठिकाणी केला होता सराव

On: January 11, 2024 5:16 PM
Sharad Mohol
---Advertisement---

Sharada Mohol | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर राज्यात वाऱ्या सारखी बातमी पसरली. भर दिवसा पुण्यासारख्या गजबजलेल्या परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शरदला मारणारा मुख्य आरोपी पळत सुटत असताना पुणे पोलिसांनी आरोपीसह 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, शरदबदल दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे.

गोळी मारण्याचा सराव-

शरद मोहोळ हत्येनंतर पुणे पोलिसांनी अवघ्या 8 तासात आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्याकडून रोज नवनवीन खुलासे बाहेर निघत आहेत. आता शरद मारण्याआघी आरोपींनी गोळीबाराचा सराव केल्याची माहिती समोर आलीये. शरदला मारण्यासाठी आरोपींनी एक दोन वेळा मुळशी येथे जाऊन गोळी कशी मारायची याचा सराव केला होता.

शरद मोहोळ (Sharad Mohol) याला मारण्यासाठी तीन पिस्तूल देखील घेतल्या होत्या. या पिस्तूल प्रकाश नावाच्या एका व्यक्तीने दिले. मग शरद मोहोळ याच्यावर अचूक गोळ्या झाडण्यासाठी मुळशीत जाऊन गोळीबाराचा सराव केला. पोलिसांच्या तपासातून हे समोर आलं आहे.

एक महिनाआधीच कट रचला-

शरदला (Sharad Mohol) मारण्याआधी आरोपी कायम एकमेकांच्या संपर्कात होते. आठही आरोपी शरदला मारण्यासाठी 15 डिसेंबर रोजी भेटले होते. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसं हा कट रचत होते आणि याचा शरद मोहोळला जरासुद्धा सुगावा लागला नाही.

खून का बदला खून से-

खून केल्यानंतर आरोपींना एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींना तपास भरकटवायचा आहे का? किंवा दुसऱ्या एका गुंडांने शरद मोहोळ याला मारण्याची सुपारी दिलीये का?. याचा तपास केला जात आहे.

या प्रकरणात मारणे टोळी आहे का? कारण संदीप मोहोळ याच्या हत्यनंतर शरद मोहळ याने मारणे टोळीशी बदला घेतला होता. यामुळे पोलीस या प्रकरणात मारणे टोळीचाही हात असू शकतो अशी शक्यता आहे.

News Title : shoot sharad mohol accussed were practicing with gun

महत्त्वाच्या बातम्या-

Dhananjay munde | महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप; राजकारणात खळबळ  

Mukesh Ambani | “…तर अँटिलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला जा”

Shahrukh Khan | ‘तेव्हाच कानाखाली…’; मुलगा आर्यन खानच्या अटकेवर शाहरुखचं मोठं वक्तव्य

Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर

Rohit Pawar Talathi Bharti l बापरे! हा बडा नेता रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now