प्री-वेडिंगला निघण्याआधीच सियाने केतनसोबत केलं होत ‘हे’ धक्कादायक कांड!

On: June 24, 2026 12:27 PM
Ketan Agarwal
---Advertisement---

Ketan Agarwal | पुण्यातील (Pune) गाजत असलेल्या लोहगड हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या केतन अगरवाल (Ketan Agarwal) याच्या मृत्यूप्रकरणी समोर आलेल्या तपशीलांनी अनेकांना धक्का बसला आहे. नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असलेल्या केतनच्या मृत्यूमागे त्याची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिच्या कथित प्रियकराचा सहभाग असल्याचा संशय पोलिस तपासातून समोर आला असून या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे.

बाली सहलीआधी घडलेल्या संशयास्पद घटना :

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बाली (Bali) येथे जाण्याच्या तयारीत होते. मात्र प्रवासाच्या काही दिवस आधीच एक अनपेक्षित घटना घडली. प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, रोकड आणि इतर साहित्य एका बॅगेत ठेवलेले असताना केवळ केतनचा पासपोर्ट बेपत्ता झाला. त्यामुळे त्यांना नियोजित परदेश दौरा रद्द करावा लागला.

या घटनेचा तपास करताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. चौकशीदरम्यान सियाने एका रेस्टॉरंटमध्ये केतनचा पासपोर्ट नष्ट करून तो फ्लशमध्ये टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी बालीची सहल रद्द झाली. आता या घटनेकडे मागे वळून पाहिल्यास ती केतनच्या आयुष्यातील पहिला धोक्याचा इशारा असल्याचे मानले जात आहे.

लोहगडवरील कट आणि तपासातील धक्कादायक माहिती :

केतनच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी सियाने त्याला लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) ट्रेकिंगसाठी नेले होते. ट्रेकिंगची विशेष आवड असल्यामुळे केतन तिच्यासोबत गेला. त्याचवेळी त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र प्रसंगावधान राखत त्याने स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर सियाने साप दिसल्याचे कारण देत गोंधळ निर्माण केला आणि परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

पहिला प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर 18 जून रोजी सिया पुन्हा केतनसोबत लोहगडावर गेली. वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने दोघे किल्ल्यावर पोहोचले होते. सुरुवातीला फोटो काढताना तोल जाऊन केतन दरीत कोसळल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तपास पुढे सरकल्यानंतर सियाने जाणीवपूर्वक त्याला ढकलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सुमारे तीन तासांच्या बचाव मोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. राजस्थानमध्ये (Rajasthan) तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून लग्नासाठी आलिशान महाल बुक करण्यात आला होता. पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. तरीदेखील सियाचे चेतन चौधरी (Chetan Choudhary) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघड झाले. केतन हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुरुवातीला हा प्रकार अपघात मानला जात होता. मात्र आर्थिक व्यवहार, वैयक्तिक संबंध आणि इतर पुराव्यांची बारकाईने तपासणी केल्यानंतर कथित प्रेमसंबंध आणि पूर्वनियोजित कटाची माहिती समोर आली. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोघांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यासह राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

News Title: Shocking Twists In Lohagad Murder

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now