Disha Salian Case | देशभरात चर्चेत असलेल्या दिशा सालियान (Disha Salian Case) मृत्यूप्रकरणात एक नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, आता पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
नवीन तक्रारीमुळे चौकशीचा वेगळा मार्ग
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची कामे सांभाळणारी प्रसिद्ध टॅलेंट मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणात नवीन घडामोडी घडत आहेत. तिच्या वडिलांनी सतीश सालियान (Satish Salian) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये दिशा सामूहिक बलात्काराची शिकार झाली असून, त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या आरोपांची गंभीरता लक्षात घेता त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे सुद्धा याचिका दाखल केली आहे. या नव्या तक्रारीत डिनो मोरियो (Dino Morea), सुरज पांचोली (Suraj Pancholi), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), तसेच दिशाचा अंगरक्षक यांच्यासह इतर काही व्यक्तींना आरोपी करण्यात यावं, अशी मागणी केली आहे. या नव्या आरोपांमुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाने नवीन दिशा घेतली असून, आधीपासूनच संवेदनशील असलेली ही केस पुन्हा चर्चेत आली आहे.
क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्येचा निष्कर्ष
मालवणी पोलीस ठाण्याने (Malvani Police Station) याआधीच या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट तयार केला होता. या अहवालातील माहिती आता समोर आली असून त्यामध्ये काही महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत.
या क्लोजर रिपोर्टनुसार दिशा सालियानने आत्महत्या केली होती, असा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे. तिच्या मृत्यूमागे कोणतीही जबरदस्ती किंवा गुन्हेगारी कृत्य नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांनी नमूद केलं आहे की, कौटुंबिक व मानसिक तणावामुळे दिशाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसून येतं. या अहवालामुळे आतापर्यंत जे राजकीय आरोप केले जात होते, त्यांच्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Title : Shocking Twist in Disha Salian Case






