Pahalgam Terror Attack | जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भारतीय लष्कर (Indian Army), जम्मू काश्मीर पोलीस (Jammu Kashmir Police) आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने मृतदेहांची पाहणी करत गंभीर निष्कर्ष काढले आहेत.
हल्ल्याच्या तपासात नवे धक्कादायक तपशील-
तपास यंत्रणांना आढळले की, २० जणांचे मृतदेह असे होते की त्यांची पँट खाली ओढलेली होती किंवा त्यांच्या पँटची चेन उघडलेली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव व धर्म विचारल्यानंतर त्यांच्या डोक्यातून जवळून (Pahalgam Terror Attack) गोळी झाडल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पीडितांकडून आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स मागितले होते आणि त्यांना कलमा वाचायला सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने पँट काढून खतना तपासण्यात आला होता. जर पीडित हिंदू असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना जागीच गोळ्या घालण्यात आल्या.
या हल्ल्यामुळे पीडित कुटुंबीय मोठ्या धक्क्यात होते, त्यामुळे कपड्यांकडे फारसे लक्ष दिले गेले नसावे. घटनास्थळी मदत कार्य करणाऱ्या पथकांनी मृतदेह तसेच उचलले आणि फक्त पांढऱ्या कापडाने झाकले होते. या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांपैकी २५ हिंदू पुरुष होते, अशी माहिती तपास यंत्रणांकडून समोर आली आहे.
दहशतवादी समर्थकांवर जोरदार कारवाई-
पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग मिळाला असून त्राल (Tral), पुलवामा (Pulwama), अनंतनाग (Anantnag) आणि कुलगाम (Kulgam) परिसरात जवळपास ७० दहशतवादी समर्थक व ओवरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासादरम्यान १५०० जणांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यापैकी ७० जणांवर गंभीर संशय आहे. लवकरच या भीषण हल्ल्याच्या दोषींपर्यंत पोहोचण्यात यश मिळेल, असा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.






