‘सिरियल किसर’ इमरान हाश्मीचा धक्कादायक खुलासा, म्हणाला..

On: February 21, 2024 11:21 AM
Emraan Hashmi
---Advertisement---

Emraan Hashmi | अभिनेता इमरान हाश्मी(Emraan Hashmi) एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक हॉरर तसेच रोमॅंटिक चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक गाणी फेमस होतात. त्याची ‘सिरियल किसर’ म्हणून ओळख आहे. मात्र, याबाबतच त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

इमरान हाश्मी नुकताच सलमान खानबरोबरच्या ‘टायगर 3’ मध्ये विलेनच्या भूमिकेत झळकला. आता लवकरच तो ‘शोटाइम’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या प्रमोशन दरम्यान त्याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

‘सिरियल किसर’ ही प्रतिमा नकळत बनली अन्

तु आता किसिंग सीन द्यायचं का थांबवलं?, असा सवाल यावेळी इमरानला (Emraan Hashmi)करण्यात आला. यावर त्याने म्हटलं की, हा माझ्या पत्नीचा सल्ला आहे आणि मी तिचं ऐकतो. आता मी माझ्या फिल्ममध्ये कीस सीन ठेवतच नाही. खरंतर आधीपासूनच मला या अशा सीन्सवर आक्षेप घ्यायचा होता.

माझी ‘सिरियल किसर’ ही प्रतिमा नकळत बनली अन् काही निर्मात्यांनी त्याचा गैरफायदाही घेतला. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ती गोष्ट आवश्यक बनली. मी जेव्हा माझे काही चित्रपट पाहतो तेव्हा मला स्वतःला वाटतं की काही ठिकाणी त्या किसिंग सीनची गरजच नव्हती, पण प्रेक्षकांना तेच पाहिजे असतं. माझ्या फिल्मसाठी हे सगळं काही केलं, पण नंतर माझ्यावर प्रचंड टीका झाली, असा खुलासा इमरान हाश्मीने केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

‘नेपोटिझम’ बद्दल मोठं भाष्य

पुढे इमरान (Emraan Hashmi) नेपोटिझमबद्दलही बोलला. ‘तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काहीच मिळालं नाही कारण ते इतर कोणाला तरी त्यांच्या फिल्मी कनेक्शनमुळे मिळतंय. हे वास्तवापासून खूप दूर आहे. नेपोटिझम कधीच संपणार नाहीये. तुमच्याकडे असे लोक असतील ज्यांना फक्त त्यांचेच लोक पुढे करायचे आहेत. या उलट असेही लोक आहेत, ज्यांनी स्वतःच्या जोरावर आपलं नाव केलं आहे. बाहेरच्या लोकांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करणं खरंच खूप अवघड आहे’, असंही इमरान म्हणाला.

पुढे तो म्हणाला की, “मी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे आणि चित्रपटाच्या पार्श्वभूमीतून आलो हे माझं भाग्य आहे. पण मला ते वारसाहक्काने मिळालं असल्याने मी त्याबद्दल माफी मागू शकत नाहीत. पण, खरंच बाहेरच्या लोकांना इथे स्थान मिळवणं खूप कठीण आहे.”

News Title- Shocking revelation of Emraan Hashmi 

महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाला 2 वर्ष झाली तरी पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत; पत्नीचा आरोप, 6 जणांवर गुन्हा दाखल

भारतीय क्रिकेटमधील 2 दिग्गज ‘भाजप’त जाणार? लोकसभा लढण्याची शक्यता

विद्या बालनच्या अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची मुंबई पोलिसांत धाव, प्रकरण काय?

विराट-अनुष्काच्या लेकाचे नाव ‘अकाय’, जाणून घ्या याचा अर्थ

राहुल गांधी यांचं ऐश्वर्या रायबद्दल विधान अन् चाहते संतापले!

Join WhatsApp Group

Join Now